मयूर पालवणकर-: मुरुड रायगड
गोठवली गावातील दत्तगुरु हाईट्स मध्ये दिवसाढवळ्या घरपोडी झाली असून घरातून सोने-चांदी मिळून एकूण ३७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला...
याबाबत लिंगुराम राजुरे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे... लिंगुराम माधवराव राजुरे हे सकाळच्या सुमारास राजूरे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याच्या तीन अंगठ्या, दोन कर्णफुल, चांदीची चैन व चांदीचे वाळे असा एकूण ३७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोराने लांबवला..
