मयूर पालणकर -: मुरुड रायगड
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्यातून वाहतूक सुरु झाली असून पावसाळ्यात वाहतुकीसाठी अडचण येऊ नये म्हणून बोगद्याच्या दुतर्फा ठेकेदार कंपनीने विविध यंत्रांसह शंभरहून अधिक कामगार कार्यरत ठेवले आहेत...
पावसाळ्यात दरड कोसळून उद्भवणारी अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे... पोकलेन, डंपर, ट्रॅक्टर यासह अत्याधुनिक सोयी सुविधा सतर्क राहणार आहेत... वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी दखल घेतली आहे... त्यामुळे पावसाळ्यात कशेडी बोगद्यातून वाहतूक पुन्हा वेगाने होणार आहे...
