महाराष्ट्र वेदभुमी

श्रीनिवास गडकरी यांना साहित्य रत्न पुरस्कार जाहीर


रोहा - विशेष प्रतिनिधी 

एस फोर सोलुशन्स प्रकाशन संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा साहित्य रत्न पुरस्कार नुकताच रोहा पेणंचे प्रख्यात साहित्यिक श्रीनिवास गडकरी यांना जाहीर झाला आहे...साहित्य, पत्रकारिता व काव्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे...

गडकरी यांनी विविध विषयां वरील एकूण पंचविस पुस्तके प्रसिद्ध आहेत... या पुस्तकांत हाताळलेले वेगळे विषय, त्याचा साहित्यिक दर्जा व गुणवत्ता या पुरस्कारा साठी विचारात घेतली गेली... आघाडीच्या मराठी वृत्तपत्रासाठी काम करतं असताना त्यांनी सतत सामाजिक प्रश्न पोटतिडकीने मांडले... त्याचा पाठपुरावा केला ते विचारात घेतले गेले... त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार तर तब्बल तीन पुस्तकांना शासकीय शिफारस मिळाली आहे... काही पुस्तकांच्या चार पाच आवृत्या निघाल्या आहेत... आपल्या पुरस्काराविषयी बोलताना गडकरी यांनी नोकरीं उद्योग सांभाळून पत्रकारीता लेखन करतं असताना अतिशय कष्ट पडले... तारे वरची कसरत करावी लागली... पण त्याचे आज फळं मिळाले असे वाटते... यापुढे माझ्या लेखनाला अधिक बळ मिळेल... पुरस्कारा निमित्त परिसरातील अनेक साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व लोकंप्रतिनिधी यांनी श्रीनिवास गडकरी यांचे अभिनंदन केले...

Post a Comment

Previous Post Next Post