कोलाड (श्याम लोखंडे )
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या येथील ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड या कारखान्यात ही दुर्दैवी घटना घडली असून छतावर पत्रे बसविण्याचे काम सुरू असताना कंत्राटी कामगार संकेत संजय पाटील (२६) राहणार आंबेघर (नागोठणे) हा इसम उंचावरून खाली पडून त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून सदरच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे तर येथील कामगारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला जात आहे...
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड या कारखान्यात उंचावर सुरू असलेल्या पत्र्याचे काम करत असताना शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर पत्र्यावर काम करत असताना हा कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने कामगार वर्गात एकच खळबळ उडाली असून येथील वातावरण भयभीत झाले आहे तर कामगार सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे...
शुक्रवारी १४ जून रोजी दुपारच्या सुमारास कारखान्यात पत्रे बसविण्याचे काम सुरू असताना संकेत संजय पाटील रा.आंबेघर (नागोठणे ) पत्रे बसविणाऱ्या कंत्राटी कामगार याचा उंचावरून खाली पडून जागीच त्याचा अंत झाला आहे... तर सदरच्या या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळाली असता रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले... येथील डॉक्टरांनी या इसमाला तपासले असता मृत असल्याचे घोषित करण्यात आले...
तर घडलेल्या घटनेमुळे याठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे... दरम्यान या घटनेचा अधीक तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गशनाखाली सुरू असल्याचे समजते...
