शहानवाज मुकादम/रोहा
जमीन मालक व अज्ञाताविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रोहा:दिनांक१४जुन २०२४ तालुक्यातील सारसोली गावालगतच्या शेताच्या बाजुला सुरुंगाचा स्फोट केल्याने एका मुलाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून जमीन मालक व अज्ञाताविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे...
शुक्रवारी दुपारी ०२ वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्ताराम कृष्णा चालके व त्याचे इतर अज्ञात साथीदार यांच्याकडून संगनमताने शेताच्या बाजुला असलेल्या ओहळाचे कातळ (खडक) फोडण्याकरीता सुरुंग लावून ठेवण्यात आला होता...
सुरुंग लावण्याबाबत त्याठिकाणी कोणतीही माणूस सुरक्षिततेबाबत बंदोबस्त केला नसल्याने त्याठिकाणी मयत व जखमी असे दोघे सुरूंग लावलेल्या भागात गेल्याने हा स्फोट झाला असता या स्फोटामध्ये दोन मुलांना गंभीर दुखापत झाली...
यात सुभाष रमेश पवार वय १० वर्ष ह्याचा मृत्यु झाल आहे.. तर दुसरा मुलगा आर्यन संजय जाधव वय ८वर्ष हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर अलिबाग येथे उपचार सुरु असुन ते दोघेही खंदार अदिवासी वाडी येथील रहिवाशी आहेत...
सदर विषयी गणेश पवार रा. खंदार याच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात कॉ,गु,र,नं,१२९/२०२४ भा,द,वी, कलम ३०४, २८६, ३३७, ३३८, ३४ सह बारी पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३ (क) प्रमाणे आरोपी दत्ताराम कृष्णा चालके व इत्तर अज्ञात इसमाविरुध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सदर गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस निरीक्षक मुपडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय वायंगणकर करीत आहेत...
.jpg)