महाराष्ट्र वेदभुमी

सतीश गावंड नंतर उरण शहरात पुन्हा एकदा गोरगरिबांना फसवून करोडो रुपयांची लूट


उरण/ १६ जून विशेष प्रतिनिधी/

उरण मधील सतीश गावंड  चिटफंड प्रकरणातून जनता सावरत नाहीत तेवढ्यात उरण मध्ये अजून एक ऑनलाइन मोबाईल खरेदी व लोन प्रकरणातून  शेकडो ग्राहकांना फसवून करोडो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात  एका पिडीताने आपली कशी फसवणूक झाली  आहे.. ते सांगताना म्हटले आहे की,मला घरगुती खर्चासाठी पंधरा ते वीस हजाराची गरज होती मी माझ्या मित्रांना लोन विषयी याबद्दल विचारले होते, हे अमर केंद्रे ला माहिती होताच तो स्वतः माझ्याकडे येऊन त्याने मी हे काम करतो असे सांगितले, तसा तो माझ्या आधीपासून परिचयाचाच होता, त्याने सांगितले की मी मोबाईल द्वारे शेकडो लोकांना लोन दिले, तशी त्याने त्यांची लिस्ट दाखवली, मी विश्वासाने त्याला माझे सर्व डॉक्युमेंट्स दिले,  सिस्टीम चालत नाही म्हणून माझ्याकडे मोबाईल राहू दे म्हणून त्यांनी विश्वास देऊन मोबाईल स्वतः जवळ ठेवला... त्यानंतर त्याने मला सांगितलं की तुझ्या मोबाईलवर मी दीड लाखाचा लोन घेतला आहे एवढे रक्कम तुला तर नको आहे तू फक्त वीस हजार ठेवून एक लाख तीस हजार मला रिटर्न दे बाकी सगळे लोणचे हप्ते मी स्वतः भरेन, त्याच्या गोड बोलण्यावर आणि त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी एक लाख तीस हजार रुपये त्याला ऑनलाईन परत केले ... परंतु दुसरा महिना आल्यावर हप्त्याच्या तारखेला त्याने मोबाईलचा हप्ता भरलाच नाही उलट माझ्या अकाउंट मधील सर्व पैसे हप्त्याच्या रूपाने उडून गेले.. त्यानंतर मला समजले की माझ्या नावावर एकच नाही तर अजून चार लोन काढलेले आहेत, त्यात एक  दीड लाखाचा कॅश टर्म लोन, एक दीड लाखाचा मोबाईल, एक पन्नास हजार चा मोबाईल, एक साठ हजारचा लॅपटॉप, अशी पाच ते साडेपाच लाखाची फसवणूक केली आहे.. आणि हे समजेपर्यंत तो फरार ही झाला होता...

 एरव्ही 5000 रुपये सुद्धा लोन देताना बँक वाले कित्येक चौकशा करतात...परंतु पाच ते दहा लाख रुपये एका दिवसात लोन पास ऑनलाईन होतेच कसा ?

यात कित्येक जणांचा संगनमत असावा...

ज्यांना नोकरीही नाही जे बेरोजगार आहेत त्यांच्याही नावाने पाच ते दहा लाख रुपये लोन होतेच कसा? 

कुठलीही मिळत वा नोकरी नसताना आणि  कमावण्याचं साधन नसताना हा लोन पिडीताने  भरावा कसा ?

 बँक वाल्यांच्या त्रासाने लोन भरण्यास असमर्थ पिढी त्याने आपल्या जीवाचे बरे वाईट केल्यास जबाबदार कोण?

 भोळ्या जनतेचा फायदा घेऊन फसवणुकीसारखे गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यांना वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर अजून अनेक नवनवीन गुन्हेगारांना रान मोकळे होईल याची जबाबदारी शासन घेईल का?

Post a Comment

Previous Post Next Post