कोलाड (श्याम लोखंडे )
रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या सन 2024 व 2025 या सालाकरिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले रामचंद्र नाकती यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे...
रोहा तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात 2018 पासून सामाजिक शैक्षणीक कला क्रिडा सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोहा रोटरी क्लब सेंट्रलच्या अध्यक्षपदी रामचंद्र नाकती यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी विजय दिवकर,आणि खजिनदारपदी राकेश कागडा यांची 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीसाठी रोटरी क्लब रोहा सेंटर यांच्या वतीने यांची निवड करण्यात आली आहे...
सामाजिक शैक्षणिक आरोग्य पर्यावरण कला क्रिडा सांस्कृतिक आणि विविध तसेच बिल्डिंग व्यवसायिक क्षेत्रात अग्रेसर असलेले रामचंद्र नाकती हे गेली चार वर्षापासून रोटरी क्लब रोहा सेंट्रल मेंबर असून त्यांनी त्यांच्या माध्यमातुन शहरी आणी ग्रामीण भागात विविध प्रकारचे उत्तम उपक्रम राबविले आहेत त्या अनुषंगाने रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांच्या वतीने यांची निवड करण्यात आली असून त्यांचे रोटरी क्लब रोहा सेंट्रल तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...