पुगाव- रोहा (नंदकुमार कळमकर)
रोहा तालुका कोलाड परिसरातून शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कै. द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कूल कोलाड येथील मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुरुवार दि. २७ /६/२०२४ रोजी कै.भालचंद्र सुळे सर यांच्या स्मरणार्थ सुळे सर यांच्या कुटूंबाकडून आयोजित करण्यात आला...
कोलाड हायस्कूल मधील कै.मुख्यध्यापक भालचंद्र सुळे सर हे उत्कष्ठ आदर्श शिक्षक होते. ते वर्गात आले की वर्गात शांतता पसरत होती. प्रत्येक विद्यार्थ्यांवर त्यांचा वचक होता. त्यांची शिकवण व संस्कार प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना मोलाची ठरले आहेत. तसेच भालचंद्र सुळे सर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटूंबाकडून हाटे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यांना ५०००/- रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.तर इयत्ता दहावी मधील इंग्रजी विषयात पहिली आलेली कस्तुरी लोखंडे हिला ५००० /-रुपये तर बारावी मध्ये इंग्रजी विषयात पहिली आलेली श्रावणी चौधरी हिला ५०००/-रुपये देऊन गौरविण्यात आले..
यावेळी सुळे मॅडम, मिसेस अँड मिस्टर मकरंद सुळे,मिलींद सुळे,माजी सरपंच सुरेश महाबळे, माजी मुख्यध्यापक येरुणकर सर,मुख्यध्यापक तिरमिले सर, संजय कुर्ले,संजय लोटणकर, पोलिस नरेश पाटील, मिलिंद खराडे, दत्ता घोणे,राजु जैन, डी आर. पाटील सर सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते...