सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
रामटेक :- कविकुलगुरू इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड सायंस (किट्स ) रामटेक मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजीत केला.... योग दिवसाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते झाले....योगाभ्यास व मार्गदर्शन डॉ. बापू सेलोकर यांनी केले... डॉ. सेलोकर म्हणाले की, नियमित योगा द्वारे शरीर व मन रोगमुक्त ठेवता येते... संचालन डीन डॉ. पंकज आष्टनकर यानी केले...
यावेळी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. उद्धल हटवार, डॉ. शिवप्रसाद, एनसीसी अधिकारी रजत यादव, शारीरिक शिक्षणचे दिनेश जोशी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते...
