महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड आंबेवाडी नाक्यावर भला मोठा भगदाड, प्रवाश्यांच्या जिवाला धोका,उपाययोजनेची मागणी


कोलाड (श्याम लोखंडे )

  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मुख्य बाजारपेठेतील तसेच कै.द.ग.तटकरे चौकातील रस्त्याला भला मोठा भगदाड पडला असुन यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला  आहे तर यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे...  

मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी नाक्यावरील निस्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे आंबेवाडी ग्रामपंचायती तर्फे ठेकेदारासहित तहसीलदार यांना निवेदन दिले.तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी रास्ता रोको केला. कोलाड पोलिस ठाण्यात निवेदन दिले.कोलाड पोलिसांनी तातडीने ठेकेदाराच्या इंजिनियर याला घेऊन रस्त्याची पाहणी केली यानंतर या रस्त्याचे थातुरमातुर काम केले परंतु त्याच्या काहीच उपयोग झाला नाही हे एकंदरीत परिस्थिती वरून दिसून येत असुन " रोज मरे त्याला कोण रडे, अशी परिस्थिती आंबेवाडी बाजारपेठेतील झाली असल्याचे दिसून येत आहे...          

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला १६ वर्षांपूर्वी सुरुवात झाली असुन सर्व कामे अतिशय संथ गतीने सुरु असुन कोणत्याही कामाला उत्तम प्रकारचा दर्जा नाही या मार्गांवरील मोऱ्या, गटारे, साईड पट्ट्या, सिमेंट काँक्रेटचे रस्ता अतिशय निस्कृष्ठ दर्जाचा बनविले आहेत कारण काही ठिकाणच्या जुन्याच मोऱ्यांवर सिमेंटचा रस्ता बनविला आहे,तर बनविलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत. गटाराचे काम ही अर्धवट तर साईड पट्ट्या ही अतिशय  निस्कृष्ठ दर्जाच्या आहेत कि या साईड पट्ट्यात दररोज वाहने अडकून अपघात होतांना दिसत आहे..        

प्रतिक्रिया 

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत परिस्थिती अतिशय बिकट असुन येथील बाय बास रस्त्याचे 

सिमेंट काँक्रेटचे रस्त्याचे काम न करता उड्डाण पुलाचे काम सुरु केले आहे ते पण पावसाळा सुरु झाल्यावर यामुळे बायपास रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.तसेच गटाराच्या निस्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे बाजारपेठेत पाणी साचून राहत आहे.पाण्यामुळे रस्त्याला पडलेले खड्डे दिसत नसल्याने  येथे दररोज अपघात होत असुन एखाद्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post