पिरकोन-उरण/२१ जून ( अजय शिवकर)
रा.जि.प.शाळा-कडापे येथे आज विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, पट्टी, त्याजबरोबर शालेय पोषण आहारासाठी डिश या वस्तूंचं वाटप करण्यात आलं.निमित्त होतं श्री. निवास गावंड सर आणि श्री. शंकर पाटील यांच्या वाढदिवसाचं..!
खरंतर या दोघांचे वाढदिवस होते मागील मे महिन्यात होते त्या दिवसांत काही आकस्मिक कारणामुळे हा कार्यक्रम पुढे आगेकूच करण्यात आला होता...
आपल्या वाढदिवसाच्या खर्चाची नाहकपणे उधळपट्टी करण्यापेक्षा गोर-गरीब शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय वस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा करणे ही मनाशी कायमची गाठ बांधून ठेवणारे निवास गावंड सर हे तसेच शंकर पाटील हे दरवर्षी आपला वाढदिवस अशा पध्दतीने साजरा करतात... त्यांच्या कडे कसल्याही प्रकारे मुबलक धन नाही तरी पण समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती मात्र कायम असते... त्यामुळेच त्यांचा वाढदिवस हा याच स्वरूपात साजरा होत असतो. आणि खरोखर खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस साजरा झाला...
आज त्या चिमुकळ्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला वैश्विक आनंद सर्वानाच वेगळं समाधान देऊन गेला...पण खरंच यासाठी लागतं ते मोठं मन...आणि म्हणुन च सांगावस वाटत...
" देणारा देत असतो, त्याने देतंच राहावे, त्याने आपले देणे कधीच थांबवू नये. घेणाऱ्याने घ्यावे पण एक दिवस त्याने सुद्धा देणाऱ्याची हि 'देण्याची' वृत्तीही घ्यावी आणि आपण ही द्यायला सुरुवात नक्की करावी...
या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्यध्यापक हितेंद्र म्हात्रे सरांनी केले, तर ज्ञानेश्वर गावंड सरांनी आपल्या मनोगतात नीटनेटकी असलेली ही शाळा,तेथील शिक्षक यांचं कौतुक केले.निवास सर यांनी हा कार्यक्रम करण्याची संधी दिली ती बद्दल शाळेचे आभार व्यक्त केले...
या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित श्री.ज्ञानेश्वर गावंड ,शंकर पाटील सर, विनायक गावंड, संतोष म्हात्रे, वत्सला म्हात्रे अंगणवाडी सेविका, आदी उपस्थित होते, सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली...



