महाराष्ट्र वेदभुमी

किहीम येथे मोफत वृक्षरोपांचे वाटप,

 


सोगाव - अब्दुल सोगावकर : 

अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत किहीम हद्दीतील नागरिकांना ६ हजार वृक्षरोपांचे मोफत वाटप कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता...

          अलिबाग येथील सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारी आगा खान सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांच्या माध्यमातून किहीम ग्रामपंचायत हद्दीत ६ हजार रोपे उपलब्ध करून प्रत्येक घरास चिकू, लिंब, जांभूळ यांची प्रत्येक प्रकारची तीन रोपे असे ९ वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच यावेळी आगा खान सामाजिक संस्थेच्या वतीने किहीम ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भित्तिचित्रे काढून जनजागृती करण्यात आली...

         यावेळी किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य दिनेश सोष्टे, संतोष किर, सदस्या निधी काठे, जान्हवी वाघे, कल्पिता आमले, स्नेहा आर्ते, नूतन थळे, जागृती झेरंडे, आगा खान सामाजिक संस्थेचे अलिबाग शाखेच्या अध्यक्षा अमृता पराडकर, प्रकल्प समन्वयक विशाल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते..

फोटो लाईन : किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्याहस्ते ग्रामस्थांना वृक्षारोपांचे मोफत वाटप करताना उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post