मयूर पालणकर -: मुरुड रायगड
पडघा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य सभेचे आयोजन शनिवारी करण्यात आले... कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत... हा कार्यक्रम पाटील यांच्या छुप्या अजेंड्याने आयोजित केला... मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरच या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले? असा सवाल बाळ्या मामा यांनी उपस्थित करत शहरात जातीय तेढ व भिवंडीत दंगली घडवण्याचा कट कपिल पाटील करत असल्याचा आरोप खासदार बाळ्यामामा यांनी केला आहे...
