मयूर पालणकर -: मुरुड रायगड
पदवीधर मतदारसंघाचे मविआ उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली...
माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी काँग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले... शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेदेखील सुरुवातीला निवडणुकीत उमेदवार उतरवले होते; परंतु काँग्रेसच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या चर्चेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले...
