महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्गाची बोंब सुरू,खांबच्या पादचारी पुलाखाली प्रवाशांवर होतोय जलाभिषेक




पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर ) 

पावसाळा सूरू होताच मुंबई गोवा महामार्गाची बोंब सुरू,दुचाकी स्वरांना तारेवरची कसरत, जीव गेल्यावर उपाय योजना केल्या जातील का?

मुंबई गोवा महामार्गाच्या गलथान कारभारामुळे इंदापूर पेण दरम्यान प्रवाशांना काही ठिकाणी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे गेली पंधरा वर्ष या मार्गाची रखडपट्टी याचे काहीच सरकारला सुख दुःख नाही पुन्हा पावसाळा सूरू होताच कोलाड नागोठणे दरम्यानच्या खांब येथील बनवलेल्या पादचारी पुलाची अवस्था अतिशय गंभीर पुलावरून धो धो पाझर त्यात खाली गुडघाभर पाणी साचून राहिल्याने बोंब सुरू झाली आहे तर अधिक पुलाखालून जाण्याच्या मार्गावरच भला मोठा खड्डा पडला असल्याने दुचाकीस्वारांना मोठी तारेवरची कसरत तर पादचारी प्रवाशांवर होतोय या घाणेरड्या पाण्याचा जलाभिषेक अधिकचा पाणी साचल्याने मोठी दुर्घटना घडू शकते तर मोठा आपघात घडल्यानंतर येथे उपाय योजना केल्या जातील का असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे...

खांब पादचारी पूल हा तयार केल्यापासुनच दर पावसाळ्यात वरून पाझरत आहे मागील में महीन्यात याची दुरूस्ती केली वर काँक्रीटीकरण नव्याने करण्यात आले तरी खाली गुडघाभर पाणी पुलाखाली साचून राहिल्याने पादचारी नागरीक यांच्या जाण्या येण्याच्याच मार्गावरच पाणी भला मोठा खड्डा पडला आहे त्यात पाणी गुडघाभर पाणी साचून राहिल्याने जा ये करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहन चालकांना यातून मार्ग काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे गेली वर्ष ना वर्ष पाऊस सुरू झाला की ही बोंब खांब करांच्या पाचवीला पुजलेले असल्याचा संताप व्यक्त सर्वत्र होत आहे...

लोखोंची उलाढाल असलेली नामवंत अशी खांब ग्राम पंचायत या ग्राम पंचायतीला पण काही या गोष्टीची काकुळती येत नाही का ग्राम पंचायत हद्दीत मोठ्या ठेक्यासाठी अनेक पुढाऱ्यांची धावा धाव सुरू असते मात्र काही नेहमीच्या काही नागरिकांच्या या मुलभूत सुविधा यांच्या कडे कायम कानाडोळा केला जात आहे त्यामुळे यावर काही उपाय योजना करण्यात याव्यात असे का सुचत नाहीत सदरच्या पुलाखाली दर पावसाळ्यात पाणी साचून राहिल्याने मोठा त्रास येथील प्रवासी नागरीक तसेच खांब येथील बाजार खरेदी करण्यासाठी येत आसलेल्या नागरीकांना होत आहे त्यामुळे पुन्हा पडलेला खड्ड्यात कोणाचे तरी जीव गेल्यानंतरच यावर येथील पुढारी धावा धाव करत उपाय योजना करतील का असा संतप्त सवाल केला जात आहे...

सन २०२० व २१ मध्ये  येथील ग्रामस्थ नागरिक यांनी कोकण विकासाचे शिलेदार दस्तुरखुद्द खासदार सुनील तटकरे यांच्या कडे याबत तक्रार व्यक्त केली होती तदनंतर खासदार सुनिल तटकरे यांनी अनेकांच्या या मार्गाच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा पाढा वाचत इंदापूर कोलाड,खांब ते पलस्पे या मार्गाचे केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पाहणी केली त्यात कोलाड येथील कुंडलिका नदी पात्रावरील पुलाचे अर्धवट काम तसेच पुई येथील महिसदरा नदी पात्रावरील पुल लवकरात लवकर उभारण्यात यावे तसेच खांब येथील या पादचारी पूलाचा देखील समावेश करण्यात तत्कालीन अधिकारी ठेकेदार यांच्या समवेत खरपूस समाचार घेतला मात्र आजता गायत त्यावर कोणतीच उपाय योजना करण्यात आली नसल्याने कुंडलिका नदी पात्र पुलाचे काम अर्धवट, पुई नदी पात्र पुलाचा पत्ताच नाही तर सदरच्या खांब च्या पुलाखालील परिस्थिती याही वर्षी जैसे थे दोन्हीं बाजूचे सर्व्हिस रोडवर पहिल्याच पावसात खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे मोठी समस्या खांब कोलाड दरम्यानच्या मार्गाची होत असताना दिसत आहे तर कोलाड नाक्यावर कधी नव्हे आता या वर्षात भर चौकात उड्डाण पुलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे या ठिकाणी देखिल खड्डे समस्या तसेच वाहतूकोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रवासी वर्गाला या जा ये करताना मोठी तरेवची करत तर रस्ता पार करताना वाहन चालकांना देखील धोका निर्माण होत असताना खांब येथील पुलाखाली दिसत आहे...

प्रतिक्रिया 

मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरी करणाचे कऱण्यात आले असून खांब येथील बनविण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहेत तसेच पादचारी पुलाखाली गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने येथून मार्ग दुचाकी तसेच रिक्षा चालक यांना मार्ग क्रमण करण्यास मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर पादचारी नागरिकांची तर अक्षरशः तारांबळ उडत आहे त्यामुळे संबधीत अधिकारी अथवा ठेकेदार यांनी यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी शिवशंभो सामाजिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अलंकार खांडेकर आणि येथील नागरिकांनी केली आहे...

मार्गावरील खांब, पुई,कोलाड आंबेवाडी नाका, भिरा फाटा,ते तीसे तळवली या दरम्यानचा प्रवास तर अक्षरशः या पावसाळ्यात धोक्याचा असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पुन्हा निवडून आलेले खासदार सुनील तटकरे हे पुन्हा या रखडलेल्या कामासाठी कोणती भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे...

Post a Comment

Previous Post Next Post