महाराष्ट्र वेदभुमी

सन २०२३ च्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून आदा


गोरेगाव प्रतिनिधी -:सिकंदर आंबोणकर

दि.२७/०६/२०२४ सन २०२३ च्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना शासनाकडून आदा केली जाणार आहे.पण नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम ई-केवायसी बंधनकारक आहे.कारण नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा होणार आहे;त्यासाठी दि.३० जून २०२४ पर्यंत शेतकऱ्यांने ई-केवायसी करून घ्यावी...

पंतप्रधान पीक विमा योजना केवळ १ रुपया मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांनसाठी जाहीर केले आहे.तरी जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व त्या योजनेची नोंदणी दि.१५ जुलै २०२४ पुर्वी करून घ्यावी.तसेच जे शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित आहेत किंवा ज्यांना योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी तलाठी, ग्रामसेवक यांच्या जवळ संपर्क साधण्याचे देखील आवाहन मा.तहसिलदार, मागणाव, उपविभागीय अधिकारी माणगाव, कृषी अधिकारी माणगाव,तसेच समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने  करण्यात आले आहे.तसेच सर्व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा...

Post a Comment

Previous Post Next Post