रायगड :- (नरेश पाटील)
कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान लातूर,उदगीर यांच्या वतीने देण्यात येणारा पत्रकार रत्न पुरस्कार समृध्द व्यापारचे संपादक तथा लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक सचिव दत्तात्रय जी परळकर यांना जाहीर झाला असून या संबंधीचे निवडपत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुबसप्पा माळेवाडे व उपाध्यक्ष संजय राजूळे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले...
पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून पत्रकार रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी कळविले आहे...
सदरील पुरस्कार ललित भवन, नळेगाव रोड, उदगीर या ठिकाणी दि.०९ जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे... या कार्यक्रमास हावगीस्वामी मठाचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे सानिध्य लाभणार आहे.. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे हे असणार असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी कळविले आहे...
या निवडबद्दल लातूर जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष संजय राजूळे, कार्याध्यक्ष गंगाधर गाडगीळ डीगोळे, शहराध्यक्ष अमोल घायाळ, पत्रकार वामन अंकुश, राजेंद्र गुडापे, विष्णू आष्टीकर, किशोर जाधव, मोहम्मद रफी, राम रोडगे, राघवेंद्र देबडवार, दत्ता माळी, ॲड उमर शेख, रामचंद्र देशमुख, दीपक इंगळे आदी सह राज्यांतील "समृद्धी व्यापार" साप्ताहिक राज्यभरातील पत्रकार प्रतिनिधी बांधवांकडून कौतुक होत आहे...