महाराष्ट्र वेदभुमी

शेतात साचलेले खाणीच्या पाण्याची योग्य विल्लेवाट लावा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

शेती पाहणीदरम्यान आदेश- मा. आमदार डी. एम. रेड्डी 

रामटेक :-  तालुक्यातील किरनापुर,  काचुरवाही परिसरातील खाणीतील डम्पिंगमुळे शेतकऱ्यांचा शेतात पाणी साचून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत होते.शेतकर्यांनी माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्याकडे तक्रार केली असता माजी आमदार रेड्डी यांनी स्वतः शेतकऱ्यांचा शेतावर जाऊन पाहणी केली. शेतकर्यांनी आपल्या व्यथा माजी आमदार  रेड्डी यांना माईंन अधिकारी यांच्यासमोर सांगितले. माजी आमदार रेड्डी यांनी लवकरात लवकर नाला करून शेतातील पाणी निकासी करण्याचे आदेश माईनिग अधिकारी यांना दिले. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी तहसीलदार यांना तत्काळ बोलावून शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांचे समस्याचे निराकरण करून देण्याचे तहसीलदार सांगण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राहुल किरपान, माईंन चे मॅनेजर अनुराग पांडे ,शेख साहेब ,शेतकरी भगवान डोकरीमारे, विठ्ठल मोहनकर, सरसराम हटवार, मुकेश वागधरे सह शेतकरी बांधव उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post