महाराष्ट्र वेदभुमी

शंकरा आय हाॅस्पीस्टल पनवेलकडून वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सन्मान


वशेणी-उरण/२९ जून/अजय शिवकर

 गेली तीन वर्षे शंकरा आय हाॅस्पीस्टल पनवेल सोबत मोफत नेत्र चिकित्सा व ऑपरेशन कॅम्प आयोजित करून उरण पेण अलिबाग परिसर  मोतिबिंदू मुक्त करण्यास योगदान दिल्या प्रित्यर्थ 

डाॅ.राजेश कापशे , डाॅक्टर गिरीश मुद्राणी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा गौरव करण्यात आला.

   वशेणी इतिहास संपादकीय मंडळा प्रमाणे महाराष्ट्रातील शिर्डी,जुन्नर,मंडणगड,मुंब्रा, अलिबाग, महड, भीमाशंकर, पेण, पनवेल ,माणगाव,महाड आदि ठिकाणी  कॅम्पस आयोजन करणा-या सामाजिक  मंडळांचा देखील सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post