सोगाव - अब्दुल सोगावकर :
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांचा गुरुवार दि.६जून रोजी ७६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
रायगड जिल्ह्यात एकेकाळी प्रसिद्ध व नावलौकिक मिळवणारे कुस्तीपटू व खोखो या खेळामध्ये तरबेज असणारे खेळाडू चोंढी येथील सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांचा जन्म चोंढी येथील एका गरीब कुटुंबात झाला, लहानपणी मोठ्या कष्टाने आपले शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण केले, घरची बेताची परिस्थिती असताना शेती, मोलमजुरी, आईस्क्रीम, भाजीपाला तसेच वेळेला पडेल ते काबाडकष्ट करीत आपल्या जीवनाचा गाडा हाकला, लग्न झाल्यावर त्यांना एक मुलगी व दोन मुले झाली, त्यांनी गावोगावी सायकलवर जाऊन आईस्क्रीम कांड्या विकून प्रसंगी भाजीपाला विकून आपल्या मुलांचे पालनपोषण करत शिक्षण पूर्ण केले. याकाळात त्यांच्या मुलांनी कुटुंब प्रपंच चालवायला त्यांना चांगली साथ दिली. आज सर्व मुलांची लग्न करून देत त्यांना नोकरी, व्यवसाय बरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे ज्ञान दिले, आज एक मुलगा महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत आहे, तर एक मुलगा किहीम ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच आहे, तसेच एक मुलगी माहेरी २ वेळा किहीम ग्रामपंचायत सदस्या होती, तर तीही तिच्या कोळगाव येथील सासरी आज सासवणे ग्रामपंचायतीची विद्यमान सदस्या आहे. त्यांच्या घरी पत्नीसह २ मुले, सुना, नातवंडे असा एकत्रित आनंदी कुटुंब आहे...
बाळू गायकवाड यांचा ७६ वा वाढदिवस त्यांच्या मुलांनी आपल्या जुन्या काळातील मित्रपरिवारांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत साजरा केला, यावेळी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित त्यांचे लहानपणीचे मित्र व ज्येष्ठ पत्रकार अशोक म्हात्रे यांनी बाळू गायकवाड यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भक्तिमय मैफिलीच्या वातावरणात त्यांच्या मित्रांनी व कुटुंबातील इतर सदस्यांनी भावुक होत आपल्या बाबांना शतायुषी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या...
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, सातिर्जे उपसरपंच उमेश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार अशोक म्हात्रे, धनाजी जोशी, दत्तात्रेय पाटील, शरद आमले, विकास जाधव, प्रमोद जाधव, विद्याधर दांडेकर, भंडारी,गंगाधर नाखवा, अरुण कोळी, ज्ञानेश्वर नाखवा, बाबू, मंगेश आमले, राजू शिंदे, नंदू कर्वे, उमाकांत नार्वेकर, मेघनाथ पाटील व इतर मित्रपरिवारांसह जावई संदेश पाटील, डॉ. किरण शेट्ये, आसिफ मलिक, निलेश उतेकर, ओंकार आमले, नदीम आत्तार, प्रदीप पाटील, विजय मोरे, सुदेश सावंत, विजय आमले व इतर पिंट्या गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते व बाळू गायकवाड यांच्या कुटुंबातील इतर सदस्य मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते...
फोटो लाईन : चोंढी येथील सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मित्रपरिवार व नातेवाईक,
