सोगाव - अब्दुल सोगावकर :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्यासह उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या ग्रामसेवक बाबुराव वनवे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले...
यावेळी किहीम ग्रामपंचायतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने गुढी उभारली व पूर्ण ग्रामपंचायत कार्यालयात रांगोळी काढून सजविण्यात आली होती.
*फोटो लाईन :* ३५० शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना उपस्थित मान्यवर व कर्मचारी,
