महाराष्ट्र वेदभुमी

जागतिक महासागर दिनानिमित्त वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता अभियान



 सोगाव - अब्दुल सोगावकर : 

८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी दी लाईफ फाऊंडेशन आणि पी. एन. पी. होली चाईल्ड सी .बी. एस. ई. स्कूल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम उपक्रम घेण्यात आला.
            या उपक्रमांतर्गत पी. एन. पी. होली चाईल्ड सी. बी. एस. ई. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती करत सर्व उपस्थितांसोबत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली, तसेच  स्वच्छता मोहिमेसाठी समुद्रकिनारा आणि त्या सभोवतालचा परिसर स्वच्छ तसेच प्लास्टिक मुक्त करण्यात आला, यावेळी संकलित कचरा हा व्यवस्थितपणे वरसोली ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या स्वाधीन करण्यात आला...


             या समुद्र स्वच्छता कार्यक्रमात पी. एन. पी. होली चाईल्ड सी. बी. एस. ई. स्कूलच्या मुख्याध्यापिका वेलैयमाल अलियास वेनी, उप-मुख्याध्यापिका सादाफ सबस्कर, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे व सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ, राखी राणे, आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली...

फोटो लाईन :जागतिक महासागर दिनानिमित्त वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थी, शिक्षक व दी लाईफ फाउंडेशनचे कार्यकर्ते,

Post a Comment

Previous Post Next Post