महाराष्ट्र वेदभुमी

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र गोरेगाव लोणेरे सेवा केंद्राकडून गंगापूजन


सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी 

दि. १६ जुन २०२४ रोजी काळनदी,गोरेगाव, ता.माणगाव-रायगड येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), गोरेगाव लोणेरे सेवा केंद्राकडून गंगा दशहरा निमित्ताने प.पु. गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आणि आ. आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रम पार पडला...

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नदीचे महत्व जनतेला पटवून देण्याचे तसेच नदीचा मान- सन्मान,स्वच्छता अभियान राबवून, पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे उद्देशाने गंगापूजन केले जाते व विपुल पर्जन्यवृष्टी करिता समुदायिक पर्जन्य सुचक वाचन देखील करण्यात आले...

सदर कार्यक्रमासाठी केंद्रामधील पर्यावरण प्रकृती व कृषी विभागाच्या प्रतिनिधीं तसेच सर्व सेवेकर्‍यांनी मोठा प्रमाणात सहभाग भाग घेतला...

Post a Comment

Previous Post Next Post