वशेणी-उरण १७ जून-:अजय शिवकर
सी ई टी /Common Entrance Test (पी .सी. एम गृप)मध्ये ९८.७३% परसेंन्टीयन गुण मिळवून वशेणी गावच्या इतिहासात सन्मानाचा तुरा खोचणा-या सन्मानीय कु.सोहम राजेंद्रकुमार गावंड मु.पो.वशेणी यांचे अभिनंदन!! कौतुक!! अभिनंदन !
वशेणी गावचे सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान गजानन काळूराम गावंड यांचा नातू, श्रीमान राजेंद्रकुमार गावंड यांचा मुलगा. आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यरत सदस्य श्री.मनोज गावंड यांचा पुतण्या कु.सोहम राजेंद्रकुमार गावंड यांच्यावर करावा तेवढा अभिनंदनाचा वर्षाव कमीच पडणार...
वशेणी ही शिक्षणाची पंढरी मानली जाते...त्याचीच ही प्रचिती म्हणावी लागेल...सोहम गावंड यास पुढील शिक्षणास आणि यशाचे पुढील शिखर यशस्वी करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळ,श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे मित्र परीवार,श्री.संदेश गावंड मित्र परिवार इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण, तसेच ग्रामस्थ मंडळ वशेणी या सर्वांनी खूप सा-या गोड गोड शुभेच्छा दिल्या...

