महाराष्ट्र वेदभुमी

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूरमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी 

दि.१९जून, इंदापूर :

 दिनांक १५ जून रोजी एस. एस. निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये प्रवेशोत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला... शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पूर्व प्राथमिक वर्ग व पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत करण्यात आले... तसेच पूर्व प्राथमिक वर्ग व इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला... शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रंजिता जाधव मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सौ. रंजिता जाधव मॅडम यांनी शाळेच्या परिपाठाच्या वेळेला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले...

    यावेळी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संचिता जाधव मॅडम व पूर्व प्राथमिक विभागाच्या इन्चार्ज सौ. संपदा पाटील मॅडम उपस्थित होत्या...तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात हा शाळा  प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला...

Post a Comment

Previous Post Next Post