महाराष्ट्र वेदभुमी

एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावा धाव, वयवृद्घ महीला पाय घसरून पडल्याने खळबळ


कोलाड (श्याम लोखंडे) 

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर ऐन पावसाळ्यात प्रवाशी वर्गाला आता एस टी बस पकडणे अवघड झाले असून बस पकडण्यासाठी प्रवाशांची तारेवरची कसरत होत आहे तर पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने बस आली रे आली की एकच धावाधाव आणि पळापळ मात्र या साऱ्या भानगडीत आज गुरुवारी २० जून रोजी पहाटे प्रवास करणारी एक वयोवृद्ध महीला भर पावसात पाय घसरून पडली असल्याचे समजते परंतू या महिलेचे दैव बलवत्तर म्हणून तिला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही तर त्या महिलेला तिचे नातलग आणि काही प्रवाशी वर्गानी उचलून तिला धीर देत कुठे लागले का याची विचारपूस करत स्वीट मार्ट दुकानदार यांनी ताबडतोब आयुडेक्स आणून दुखापत झालेल्या पायाला लावले मात्र या घटनेमुले सर्वत्र एकच खळबळ उडाली असून कोणी प्रवाशांचा जीव गेल्यावर या ठिकाणी सुविधां उपलब्ध केल्या जातील का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे...

मुंबई महामार्गावर असलेला कोकणातील मध्य ठिकाण म्हणजे कोलाड आंबेवाडी नाका हा सर्वांनाच सुपरिचित असल्याने या ठिकाणाहून प्रवाशी वर्गाला सर्व ठिकाणी प्रवास करण्यास सोईस्कर होत असल्याने अनेक प्रवाशी पसंती या नाक्याला देतात परंतु याच नाक्यावरून आता प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाला एस टी बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर वाहतूक कोंडीमुळे प्रवास धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल कोण बघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करणाचे काम गेली तेरा चौदा वर्षे चालू तर येथील कोलाड आंबेवाडी नाका येथे ऐन पावसाळ्यात उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे येथील दोन्हीं बाजूचे सर्व्हिस रोड हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अरुंद अवस्थेत त्यात कोसळत असलेल्या पावसात पडले भले मोठे खड्डे त्यात साचून राहते गुडघाभर पाणी तसेच चौकात उड्डाण पुलाचे खोदकाम सुरू असल्याने येथील सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने पूर्वी बनविलेल्या प्रवासी निवारा शेड या तोडण्यात आल्या आहेत त्यामुळे कोलाड हून मुंबई कडे प्रवास करणारे प्रवाशी ,तर कोलाड हुन रोहा मुरुड, त्याच बरोबर कोलाड हून सुतारवाडी, भिरा,पुणे,तसेच इंदापूर,माणगाव,महाड सह तळ कोकणात ,तसेच महाबळेश्वर वाई सातारा, कोल्हापूर, तुळजपूर ,पंढरपूर,प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच शाळा कॉलेज महाविद्यायांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना या ठिकाणी पावसाळ्यात एस टी बस पकडण्यात मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर येणाऱ्या जाणाऱ्या एस टी बस या मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने कुठे मागे पुढे थांबल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः धावाधाव आणि पळापळ होत असल्याने साचलेले पाणी आणि चिखल मातीमुले पाय घसरून प्रवाशी पडत असल्याच्या घटना घडत आहेत...

तरी संबधीत खाते आणि अधिकारी वर्गाने याकडे विशेष लक्ष केंद्रित करून येथील प्रवाशी वर्गाला सोईस्कर प्रवास तसेच एस टी बस पकडण्यासाठी आणि त्यांना उभे राहण्यासाठी बस स्थानक निवारा शेड उभारले जातील अशी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post