गोरेगाव - विशेष प्रतिनिधी
हल्ला केल्या प्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल
महाड तालुक्यातील मौजे इसाने-कांबळे गावात गेले कित्येक दिवस बेकायदेशीररित्या गोवंश प्राण्यांच्या हत्या करून काही नराधम त्याचा व्यवसाय करित होते.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश प्राण्यांची हत्या होणार असल्या बाबत माहिती मिळताच गोरक्षकांनी संबंधित महाड ( एम. आय. डी. सी. ) पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना सूचित केले. दि. १८ जून २०२४ मंगळवारी सकाळी ०९:३० च्या सुमारास गोरक्षक आणि पोलीस दलाने करीम अब्दुल कादीर दळवी याच्या राहत्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चालू असलेल्या गोहत्या प्रकरणी छापा मारला असता या गोहत्यातील सहभागी कसाई व त्याच्या अन्य साथीदारांनी तेथील ३ गोरक्षकांवर हल्ला चढविला.या मध्ये दिनेश दरेकर हा गोरक्षक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारार्थ महाड येथील रानाडे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे...
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्हय़ातून गोरक्षकांनी महाड ( एम. आय. डी. सी. ) पोलीस ठाण्यात धाव घेऊन गोवंश हत्या करून गोरक्षकांवर उघडपणे हल्ला करणार्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.सदर घटनेमुळे महाड पोलादपूरसह संपूर्ण विभागात प्रचंड तणाव निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,महाड तालुका उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी महाड ( एम. आय. डी. सी. ) पोलीस ठाण्यात स्वतः पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले व पोलीस दलाला मार्गदर्शन करून १५ मुख्य आरोपींना अति-तातडीने अटक केले...
आरोपी करीम कादिर दळवी,दाऊद मोहम्मद अली जुळवे,मतील कारभारी,फैज कालसेकर,असद पठाण,मुस्ताक कारभारी,मुस्ताक बट्टे, मुक्तार दुकानदार,हमीद कारभारी,अहमद सलीम जुवले,आरशद पठाण, मेहबूब पुरकर,अजिज काळसेकर,हुसेन काळसेकर,इमरान कादिर दळवी यांच्यावर आयपीसी ३०७,३५३ ,३३२,३२३,१८९,१४३,१४७,१४८,१४९ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१),१३५ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली असून पुढिल तपास सपोनि श्री. जे. एच.माने महाड (एम.आय.डी.सी.) करित आहेत...
ज्या देशात राहता तिथला कायदा तुम्हाला मानावा लागेल बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक - आदित्य गोरेगांवकर यांचे विधान
परंतू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी मध्ये गोवंश हत्येचे प्रकार वारंवार घडत आहेत हि मोठी शोकांतिकाच आहे. सरकारद्वारे कठोरातील कठोर निर्बंध जाहीर केले असताना सुद्धा आपल्या विभागात होणार्या गोवंश प्राण्यांची कत्तलीमुळे बजरंग दल ( रायगड ) ही संघटना खूप आक्रोशात असून ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाचा कायदा तुम्हाला मानावा लागेल आणि तसे होत नसेल तर हे तर हे संपूर्ण जग तुमच्यासाठी मोकळा आहे,आपल्याला आवडेल त्या पर्यायाचा अवलंब करावा असे तिखट वक्तव्य बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक आदित्य रमेश गोरेगांवकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना केले...
