महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यातील मेढा गावचे नारायण पराडकर यांचे वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन.



कोलाड (श्याम लोखंडे)  

रोहा तालुक्यातील मेढा गावचे रहिवासी नारायण रामचंद्र पराडकर यांचे सोमवार 17 जून रोजी वयाच्या 76 व्या वर्षी रोहा येथे त्यांचे पुत्र दीपक पराडकर यांचे निवासस्थानी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले...

नारायण पराडकर हे सुरुवातीला काही वर्षे ते पेपर मिल या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते त्यांना वाचन आणि लिखाणाची खूप आवड होती मराठी कविता तसेच गझल उर्दू कविता आणि अद्याक्षरांवरील कविता यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांवर व मान्यवर व्यक्तींवर त्यांनी अद्याक्षरांवरून कविता केल्या आहेत.तसेच त्यांनी अनेक काव्य स्पर्धांमधून विविध स्तरांवर पुरस्कार मिळवले कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पाली येथे झालेल्या काव्य स्पर्धेमध्ये मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्यांना काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक पुरस्काराने गौरविण्यात आले होते...

तसेच रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन व रोहा टाईम्स तर्फे त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते तसेच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते त्यांचे साहित्य कविता विविध दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत त्यांचा एक काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध झाला असून एका पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना सुद्धा दिली आहे तसेच रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन तर्फे आणि रोहा टाइम्स तर्फे त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मेढा साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे काम पाहिले तसेच त्यांनी अनेक काव्य  मैफिली गाजवल्या साप्ताहिक रोहा टाईम चे सहसंपादक म्हणून काम पाहताना त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचे अनेक लेख सुद्धा गाजले तसेच ते कोमसाप रोहा शाखेचे सदस्य होते त्यामुळे कोमसाप रोहा शाखेतर्फे  त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात व पत्रकारितेमध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व नातू असा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी 26 जून रोजी रोहा स्मशानभूमी येथे होणार असून त्रयोदश दिन विधी (तेरावा )29 जून रोजी रोहा येथे होणार आहे..

Post a Comment

Previous Post Next Post