पेण /२२ मे/अजय शिवकर/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, २१ मे २०२४ ला दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने लागला...
. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती... गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता... तर यावर्षी ९३.३७ टक्के लागला आहे...
यंदा एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली... त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत...
बारावीच्या निकालात मुली धमाका करताना दिसल्या आहेत... मुलांपेक्षा मुलींनी तब्बल 3.27 टक्क्यांनी अधिक बाजी मारली
यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुलं, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत...
सार्वजनिक कॉलेज पेण मधुन केळवणे गावची सलोनी पाटील बारावी सायन्स परीक्षे मध्ये प्रथम आली आहे...
केलवणे गावातील श्री.अनंत अर्जुन पाटील यांची मुलगी सलोनी अनंत पाटील हिने बारावी सायन्स या परीक्षेत 85.67% गुण मिळवून सार्वजनिक कॉलेज पेण येथेप्रथम क्रमांक पटकावला आहे.
सलोनी अभ्यासात खूप हुशार असून तिला वाचन ,वक्तृत्व ,गायन ,न्रुत्य यामध्ये खूप आवड आहे, तिला
दहावी मध्ये -92% को . ए. सो हायस्कूल केळवणे (प्रथम क्रमांक )
अकरावी -सायन्स 92.50% सार्वजनिक विद्यामंदिर कॉलेज पेण (प्रथम क्रमांक )
बारावी , सायन्स 85.67%
सार्वजनिक विद्यामंदिर कॉलेज पेण ( प्रथम क्रमांक )
घेऊन हॅट्रिक केली आहे...
सलोनीचे आणि तिच्या शिक्षकांचे तसेच तिच्या आई-वडिलांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे...


