शहानवाज मुकादम/रोहा
माणगांव:येथे दि:20 मे 2024,रोजी मानवाधिकार मिशन रायगड चे अध्यक्ष रशाद करदमे(श्रीवर्धन)यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती...
सदर सभेत माणगांव तालुका समिती ची निवड करून अध्यक्ष गुलजार खान, उपाध्यक्ष यासिर मन्सूर मुकादम व हृतिकेश विलास मोरे यांची निवड करण्यात आली आहे...
या सभेत नदीम राऊत, शाहजहान जळगावकर, सादिक अंसारी, हाफिज नदफ,अब्दुल्ला सैन अदी मान्यवर उपस्थित होते...
उद्दिष्ट लोकांना शांतता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि मानवी सुरक्षेसाठी त्यांचे आदर्श आणि आकांक्षा लक्षात घेण्यास सक्षम करून जिल्ह्यात ओळखीच्या संकल्पनेला चालना देत आहे...
शांतता आणि समृद्धी, बंधुता आणि एकता, आरोग्य आणि मानवता, आणि सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि रोजगार, समान संधी, न्याय आणि स्वातंत्र्य, सुरक्षितता आश्या अनेक विविध मुद्दय़ांवर समाजात आपले योगदान देत आहे...
तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून नागरिकांना वेळोवेळी आणी प्रसंगातील लोकांपर्यंत संपर्क साधण्यास व गरजूंच्या मदतीसाठी अनेक व्हॉटसप ग्रुपवर 24 तास सेवेसाठी उपलब्ध असतात..
सद्या जिल्ह्यात अनेक तालुका स्तरावर समित्या स्थापन करून रायगड जिल्ह्यात समाज सेवेचे कार्य जोमात सुरु असल्याचे दिसुन येते...
