रोहा विशेष (प्रतिनिधी)
रोहा पोलिस ठाणे हद्दीत राहणारा राकेश येलकर रा. देवकान्हे रोहा याला मा.उपविभागीय अधिकारी सो.रोहा यांनी तीन महिने करिता रायगड जिल्हा येथून तडीपार केले होते त्यानुषंगाने काल गुरूवारी 16/05/2024 रोजी रोहा पोलिस ठाणे हद्दीत आल्याची गोपनीय मिळताच त्या अनुषंगाने तांत्रिक सहायाची मदत घेऊन रोहा येथील मौंजे देवकान्हे येथे स्टाफ सह रवाना होऊन त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिस पकडुन पंचनामा करून त्याचेवर रोहा पोलिस ठाणे गु.र.नंबर 118/2024 महा पोलिस अधि.142 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला crpc ४१(१)(अ) प्रमाणे नोटिस देऊन आज रोजी hc/सकपाळ, pn/बेल्हेकर यांचे सोबत सिंधुदुर्ग येथे त्याची बहीण हीचे घरी घेऊन रवाना झाले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास करून मुदतीत चार्ज शिट मा. न्यायालयात दाखल करण्यात आले..
सदर रोहा पोलीसांकडून मिळालेला माहिती नुसार आरोपीत इसम नामे राकेश गणेश येलकर रा देवकान्हे, रोहा, ता. रोहा, जि. रायगड यास महा. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये रायगड जिल्हयातून निघून जाणेबाबत मा.उपविभागीय दंडाधिकारी सो. रोहा यांचे कडील आदेश क्रमांक हदद्वार दावा क्रमांक ०८/२०२३ दिनांक १८/०४/२०२४ अन्वये बजावलेल्या आदेशाप्रमाणे रायगड जिल्हयातून ३ महिन्याकरीता हददपार होणेबाबत निर्देष देण्यात आला असताना देखील तो सक्षम प्राधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मा. उपविभागीय दंडाधिकारी सो रोहा यांचेकडील आदेशाचे उल्लंघन करून रायगड जिल्हयात प्रवेश करून मौजे देवकान्हे ता. रोहा येथे वास्तव्य करीत असताना मिळून आला असुन रोहा पोलिस निरिक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक अधिक तपास सुरू आहे.
.jpg)
