महाराष्ट्र वेदभुमी

अखेर मोर्बा रोडवरील एलईडी दिवे कार्यान्वीत, नागरिक समाधानी.

 



माणगाव (नरेश पाटील) :  

शहरातील अत्यंत महत्त्वाचे गजबजलेले रस्ते म्हणून ओळखले जाणारे मोर्बा रोडवरील सर्व एलईडी पथे दिवे मंगळवार दि.१४ पासुन कार्यान्वीत झाल्याचे पहायला मिळत आहे... दरम्यान तब्बल दिडमहिन्यापूर्वी २६ दिवे रात्री कार्यान्वीत झाले... दिड महिना पुर्वी टप्याटप्प्याने अनेक दिवे बंद पडत असल्याची चित्र निदर्शनास येत होती, जे कालांतराने अर्थातच गेल्या महिन्याभरात सर्व पथ दिवे बंद पडले, दि.१४ मे पासून पुन्हा पेटू लागले आणि मोर्बा रोड पुन्हा शुभ्र प्रकाशने झळकू लागला आहे.. 

                या समस्यांबाबतीत लिखाण करून संबंधित विभागाने उशीरा का होईना परंतु याबाबत दखल घेतली, त्याचबरोबर अनेक नागरिकांनी अनेकदा तक्रार केल्याचीही माहिती समोर आली... शहरातील ईतर सर्व मार्गावरील पथ दिवे पेटत आहे, मग मोर्बा रस्ता का अंधारात ? असे प्रश्न विचारून जिल्हा प्रतीनिधीकडे नागरिकांनी खंत व्यक्त केली मात्र आत्ता सर्व दिवे पेटत आहेत असे सांगीतले असता सायंकाळी उशिरा थेट रस्त्यावर येवून खातर जमा केली असता अत्यंत समाधान नागरिकांनी व्यक्त केले...

             मोर्बा रोड कॉर्नरवरील काही महिना पुर्वी बसविलेल्या हाय मास्क व्होल्टेज लॅम्प येत्या दोन दिवसात चालु होणार असल्याचे ही माहिती हाती लागल्याने गजबजलेला मोर्बा रोड कॉर्नर लखलखीच्या प्रकाश ज्योताने चमकणार आहे जो माणगाव शहराचे वैभवात भर पडेल...

Post a Comment

Previous Post Next Post