कोलाड (श्याम लोखंडे )
कोणाची मशाल पेटणार चर्चेला उधाण.
रायगडचा गड कोण जिंकणार ? विकासाचे शिलेदार महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे की महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे निष्कलंक उमेदवार अनंत गीते या बाबत आता नाक्या-नाक्यांवर चर्चेला उधाण आले असून ,रायगडकरांसह संपुर्ण महाराष्ट्राचे डोळे या निकालाकडे लागले असून कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रायगडाचा राजधानीत कोनाची विजयाची मशाल पेटणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे...
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान ७ मे रोजी झाले.तर रागडच्या राजधानीवर मोठी संघर्षाची आणि अस्मितेची समजली जाणारी ही लोकसभेची निवडणूक कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू झाली आहे पण मतदानाचा टक्का घसरला आहे त्यामुळे उमेदवारांची विजयाची धाकधूक वाढली आहे तर निवडणुकीत कोण जिंकणार कोण गुलालाची उधळण करणार तसेच प्रचार दरम्यान केलेले एकमेकांविरोधातील दावे प्रती दावे कोणाला यशस्वी ठरतात याकडेच रायगड सह उभ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.निवडणुकीत महायुतीचे खा. सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते आमनेसामने आल्याने निवडणुक मोठी चुरशीची ठरली आहे. मतमोजणीला अद्याप काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्सुकता शिगेला पोहोचली असून विजयाचे शिलेदार कोण तटकरे की गीते? याच चर्चेला खांब,कोलाड आंबेवाडी नाका नाक्या-नाक्यावर उधाण आल्याचे दिसुन येत आहे...
मतदानाचा टक्का घसरला अल्पशा मतदानात कोण निवडणुक जिंकणार,कोणाची मशाल पेटणार
३२ रायगड रत्नागिरीत लोकसभेसाठी ६०.५१ टक्के विधानसभा मतदारसंघात अवघे मतदान झाले असुन 191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 308 इतके मतदार असून 1 लाख 95 हजार 653 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख 2 हजार 255 पुरुष तर 93 हजार 398 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...
192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 97 हजार 396 मतदार असून त्यापैकी 1 लाख 98 हजार 289 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख 629 पुरुष तर 97 हजार 660 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
193- श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 62 हजार 266 मतदार असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 254 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 75 हजार 968 पुरुष तर 79 हजार 286 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...
194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 84 हजार 386 मतदार असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 696 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 83 हजार 416 पुरुष तर 80 हजार 280 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...
263-दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 80 हजार 261 मतदार असून त्यापैकी 1 लाख 60 हजार 798 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 75 हजार 810 पुरुष तर 84 हजार 988 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...
264-गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 40 हजार 755 मतदार असून त्यापैकी 1 लाख 35 हजार 877 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 62 हजार 256 पुरुष तर 73 हजार 621 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...
32 रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनूचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.तर मतदार संघात एकुण 16 लाख 68 हजार 372 मतदानापैकी केवळ 10 लाख 9 हजार 567 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी 60.51 टक्के एवढाच झाला आहे...
भूतो ना भविष्य देश राज्य पातळीवरील साऱ्या नेत्यांनी येथील उमेदवारांसाठी केला कंबर कसून प्रचार
मागील पाच वर्षात महाराष्ट्रतील राजकारणात पक्ष पक्षांतर झाल्याने अनेक घडामोडी झाल्याचे पहावयास मिळाले तर केंद्रात भाजप सत्तेत असल्याने अधिक महाराष्ट्रात कधी नव्हे ते राजकारण सर्व सामान्य जनतेला पाहवयास मिळाले कोणी आमदार पळविले तर कोणी पक्षाच चोरून नेल्याने मोठा सत्ता संघर्ष त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या खात्याचा मंत्री आहे हे देखील काहीना कळत नव्हते तर केंद्रातून एकच नारा पुन्हा मोदी सरकार चारसो पार च्या घोषणा सूरू झाल्या यासाठी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत दोन गट काँगेसच्या मोठं मोठया नेत्यांचा भाजप पक्ष प्रवेश झाला.त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीला अधिक रंग चढला होता त्यामुळे सर्व नेत्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या अधिकच उंचावल्या तर महाराष्ट्रात नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँगेस नेते राहुल गांधी, शेकाप चे जयंता भाई पाटील,आम.आदमी पक्ष तसेच इंडीया आघाडीच्या नेत्यांना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप नेते अमित शहा,योगी,सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री अजित पवार,राज ठाकरे ,यांच्या सह अनेकांनी आपपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसून रायगड, रत्नागिरी, पुणे, बिड, बारामती, सोलापूर, सांगली, अमरावती, अ.नगर,सह मुंबई, ठाणे,विविध ठिक ठिकाणी मोठा प्रचार केला तसेच त्यांच्याच प्रचाराला प्रतिउत्तर म्हणून नेते शरद पवार,उध्दव ठाकरे, सुषमा अंधारे,आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रचाराची फटके बाजी करत चारसो पारचा दावा करणाऱ्या भाजपला तडीपार करा असा नारा दिला आहे...
सुनील तटकरे यांच्या विरोधातील नेत्यांवरच निवडणुकीत आली प्रचार करण्याची वेळ
32 रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदर सुनील तटकरे यांना 2019 च्या निवडणुकीत ज्या भाजप नेत्यांनी त्यांना पराभूत करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली होती त्याच त्याच नेतेगणांवर पुन्हा सुनील तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून द्या वेळ आली त्यामुळें एकेकाळचे एकमेकांसमोरचे वैरी मित्र पक्षात आल्याने पुन्हा मित्र पक्ष महायुतीचा प्रचार करावे लागला तर रायगडात अनेकांना राजकारणातून घरी बसावे लागले आहे याचे उदाहरण अनेक आहेत तर तटकरेंच्या राजकिय जीवनात स्व. बॅरिस्टर अंतुले ,त्याच बरोबर नेते शरदचंद्र पवार अशा महान नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसले त्यामुळे या धर्तीवर सुनील तटकरे यांच्या पराभवासाठी तर महाविकास आघाडीचा उमेदवार अनंत गीते यांना लोकसभेत भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात प्रचारासाठी उतरले होते...
रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार सुनील तटकरे, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात जोरदार लढत झाली. एकास एक लढतीचे चित्र बदलून नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या.देशातील, राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, पदयात्रा घेतल्याने येथे प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला होता...
याहीवेळी पूर्वापार प्रतिस्पर्धी महायुतीचे खा. सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्याततिसऱ्यांदा लढत झाली आहे. दोनही पक्षांचे नेते-कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येईल असा दावा करीत आहेत... त्यामुळे कोणाचा दावा खरा ठरतोय? हे पहाण्यासाठी 4 जूनच्या मतमोजणीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मतमोजणीला अद्याप काही दिवस बाकी आहेत.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची उत्सुकता ही शिगेला पोहोचली असून तटकरे की गीते? नाक्या-नाक्यावर यावरच चर्चेचा उधाण आले असल्याचे दिसून येत असून रायगडच्या राजधानीत घड्याळ की मशाल कोण विजयाची मशाल पेटवनार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे...
