महाराष्ट्र वेदभुमी

अदिवासी बांधवांना कपडे व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन


पिरकोन - उरण /२७ मे/अजय शिवकर/  

आपल्या आजूबाजूच्या परिसरात कित्येक गोरगरीब व गरजू लोक असतात की ज्यांना दोन वेळचे जेवण कसे मिळावे यासाठी खूप काबाडकष्ट करावे लागतात, तरी त्यांना आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कपडे खावू व इतर काही वस्तू योग्य प्रमाणात मिळत नाहीत, म्हणूनच क.भा.पा.सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान व ९३/९४ एस. एस. सी. बॅच पिरकोन, तसेच  सारडे विकास मंच सारडे. यांच्या आयोजनातुन अदिवासी बांधवांना कपडे व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...


इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली पूर्व, येथील माननीय मुख्याध्यापिका, सौ.निर्जला पाटील मॅडम, शिक्षिका,सौ.अस्मिता सामंत मॅडम,सौ.विजया नायर मॅडम. लिपिक.सौ.रेखा राजे,श्रीमती वर्षा प्रभू,सौ.शितल बापट,सौ.चैताली घमंडे, श्री.अजित मोरे,श्री.प्रकाश सावंत. केळवणे - पनवेल येथील शिक्षक प्रसिद्ध चित्रकार,श्री. गिरीश मारूती घरत. चेंबूर मुंबई येथील बाल विकास  संघाचे शिक्षक व कर्मचारी वर्ग. ज्योती घरत .पाणदिवे गावची शिक्षिका कु.कृतिका ठाकुर मॅडम .तसेच कर्मवीर भाऊराव पाटील सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य  तसेच सारडे विकास मंच चे सदस्य श्री. धनंजय म्हात्रे सर, आणि आदर्श शिक्षक श्री.रविंद्र पाटील सर

वरील सर्व दानशूर व्यक्तींनी दिलेले कपडे  आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम, रविवार २६ मे  ला सकाळी १०.००.वाजता. पुनाडे अदिवासी वाडीवर सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला...

आदिवासी बांधवांना कपडे आणि खाऊ मिळाल्यानंतर बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांचे मन सुखावले...

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध चित्रकार शिक्षक श्री.गिरीष घरत सर , सारडे विकास मंच चे अध्यक्ष  नागेंद्र म्हात्रे सर, सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम गावंड, सदस्य. संतोष जोशी,कामेशवर म्हात्रे, सचिन पाटील, कैलास पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, विजय गावंड, अरूण म्हात्रे ,कु.मोक्ष गिरिष  घरत,कु.अनुष सचिन पाटील. वरील सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते...

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामेशवर म्हात्रे तर स्वागत हरीश म्हात्रे यांनी हे केले...

सर्व दानशूर व्यक्तींचे तसेच उपस्थितांचे  संतोष जोशी यांनी आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post