शहानवाज मुकादम/रोहा
दि: २० मे २०२४
रोहा पोलिस ठाणे हद्दीत राहणारा राकेश गणेश येलकर यास मा.उपविभागीय दंडाधिकारी रोहा यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी रोहा पोलीसांकडून कारवाई...
सविस्तर,
आरोपी राकेश गणेश येलकर रा. देवकान्हे ता.रोहा यास महा. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये रायगड जिल्ह्यातून निघुन जाणेबाबत मा. उपविभागीय दंडाधिकारी रोहा यांचेकडील आदेश क्रमांक हद्दपार दावा क्र:०८/२०२३ दि:१८/०४/२०२४ अन्वये बजावलेल्या आदेशाप्रमाणे आरोपी राकेश येलकर यास रायगड जिल्ह्यातून ३ महिन्या करिता हद्दपार होणेबाबत निर्देश देण्यात आला होता..
आरोपी राकेश येलकर यानी सक्षम प्रधिकारयांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मा. उपविभागीय दंडाधिकारी रोहा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रायगड जिल्ह्यात प्रवेश करून मौजे देवकान्हे येथे वास्तव्य करीत असताना पोलीसांना मिळुन आला...
आरोपीचा इतिहास १) रोहा गु.र.नं. ६९/२०२२ भादवी कलम ३५३, ५०६. २) रोहा गु.र.नं. २६/२०२३ भादवी कलम ४९८ अ,३२३, ५०४, ५०६, आणी कॉ.गु.र.नं. ११८/२०२४ महा.पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद रोहा पोलीस ठाण्यात आहे...
आरोपी राकेश गणेश येलकर हा दि:१६/०५/२०२४ रोजी रोहा पोलिस ठाणे हद्दीत आल्याची गोपनीय बातमी पोलीसांना मिळाली असता रोहा पोलीसांनी तांत्रिक सहायाची मदत घेऊन रोहा येथील देवकान्हे येथे स्टाफ सह रवाना होऊन आरोपी राकेश येलकर यास ताब्यात घेतले...
पोलिसांनी सदर प्रकरणी पंचनामा करून आरोपीविरुद्ध रोहा पोलिस ठाणे गु.र.नंबर ११८/२०२४ महा पोलिस अधिनियम १९५१चे कलम १४२ प्रमाणे फिर्यादी जयेंद्र गजानन पेढवी नेमणूक रोहा पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
आरोपी यास सीआरपीसी ४१(१)(अ) प्रमाणे नोटिस देऊन हेड कॉन्स्टेबल/सकपाळ, पोलीस नाईक/बेल्हेकर यांचे सोबत सिंधुदुर्ग येथे आरोपीची बहीण हिच्या घरी घेऊन रवाना झाले..
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक एस.ए.ऐदाळे करीत आहेत...
तसेच सदर गुन्ह्याचा तपास करून मुदतीत चार्ज शिट न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रोहा पोलीसांकडून मिळालीआहे...
