पुगांव रोहा ( नंदकुमार कळमकर)
पत्नी वरदाताई तटकरे यांची प्रचारात आघाडी .
३२ रायगड रत्नागिरी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कोकण विकासाचे शिलेदार कर्तव्यदक्ष कार्यतत्पर सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार गणात गावागावात प्रचार सभा व गाव भेट दौरा तटकरेंच्या विजयासाठी गेल्या सात आठ दिवसापासून प्रचार फेऱ्या युद्ध पातळीवर सूरू असुन आंबेवाडी जिल्हा परिषद गणातून या फेऱ्याना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आंबेवाडी पंचायत समिती गण व खांब पंचायत समिती गणात महायुतीच्या भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट,आरपीआय, मनसे व सर्व महायुतीतील कार्यकर्ते व पदाधिकारी तटकरेंसाठी निवडणूक प्रचार करीत आहेत...
प्रचार दरम्यान रोहा तालुक्यातील इतर जिल्हा परिषद मतदार संघापेक्षा आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात जास्तीत जास्त मताधिक्य खासदार सुनीलजी तटकरे यांना मिळणार असे रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.कोकणचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,पनवेल चे आमदार प्रशांत दादा ठाकूर, पेणचे आमदार रवीशेठ पाटील ,भाजप रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, लोकसभा संयोजक नेते सतीश धारप, पेण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रसाददादा भोईर,युवा नेते वैकुंठशेठ पाटील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभेचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांचा प्रचार व गावभेट दौरा करीत मतदार यांच्याशी जवळीक साधत आहेत ...
तसेच तालुक्यातील पहूर येथे झालेल्या गावभेट प्रचार सभेत लोकसभेचे उमेदवार दस्तुरखुद्द सुनिलजी तटकरे यांच्या पत्नी सौ. वरदाकाकी तटकरे या देखील पती सुनील तटकरे यांच्या प्रचारात आघाडी घेत येथील महिला वर्गांच्या भेटी दरम्यान त्यांच्या समस्या जाणून घेत तटकरे यांच्या प्रचारार्थ आघाडी घेतांना दिसुन येत आहे.यावेळी रोहा तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, राष्ट्रवादी रोहा तालुका महिला अध्यक्षा सौ प्रीतम ताई पाटील,ज्येष्ठ नेते रोहा तालुका उपाध्यक्ष विष्णू मोरे , सुतारवाडी विभाग भाजप नेते राजाभाऊ किर्जत,सुतारवाडी भाजप नेते नथुराम साळवी, ज्येष्ठ नेते हिरामण दळवी, येरळचे सरपंच सुरेश जाधव, पहूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामस्थ व महिला भगिनी पहूर गावातील प्रचार सभेसाठी उपस्थित होत्या. यावेळी आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात जास्तीत जास्त मताधिक्य खासदार सुनीलजी तटकरे यांना मिळणार असे रोहा तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले ...

