महाराष्ट्र वेदभुमी

परहुरपाडा येथील प्रसिद्ध काविळ वैद्य शिवाजी(अण्णा) राणे यांचे निधन




सोगाव - अब्दुल सोगावकर :

 अलिबाग तालुक्यातील परहुरपाडा येथील प्रसिद्ध काविळ वैद्य व घोडेवाले शिवाजी(अण्णा) बाबाजी राणे (वय ८१) यांचे शनिवार दि.२७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या निधनाबाबत याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजी राणे हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. तसेच ते को. ए. सो. कै. ध. श. खोपकर परहुर शाळेचे सदस्य होते...

             अलिबाग तालुक्यात ते शिवा राणे म्हणून ओळखले जात होते. ते एक उत्तम काविळ वैद्य म्हणून प्रसिद्ध होते, काविळ आजारसह इतर आजारांवर ते खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करत होते, रुग्णाला नुसते आयुर्वेदिक औषधे न देता त्या रुग्णाला बरे वाटेपर्यंत पाठपुरावा करून त्याची आत्मीयतेने त्याच्या घरी जाऊन चौकशी करत असत. यासोबतच त्यांना पूर्वीपासून घोडे पाळण्याची हौस होती, त्यांना बैलगाडी व घोडागाडी शर्यत प्रेमी म्हणून ओळखले जात होते, त्यामुळे घोडेवाले शिवा राणे म्हणून ते बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या अंतीमदर्शनासाठी व अंत्यसंस्कारावेळी अलिबाग तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवावर परहुरपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले...

           त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचे दशक्रिया व बारावे विधी सोमवार दि.६ मे २०२४ रोजी या एकाच दिवशी परहुरपाडा येथील राहत्या घरी होणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post