रोहा:- विशेष प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची रणधुमाळी देशात तसेच विविध राज्यात सुरु झाली आहे. या पारश्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून राहिलेल्या रायगडच्या राजधानीत निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यातील असून गीते यांच्या प्रचारासाठी सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या होम ग्राऊंडवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर प्रचार सभा आज रोहा येथे संपन्न होत आहे.त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारार्थ अंधारे ताई काय तोफ डागनार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे...
येत्या ७ में रोजी होत असलेली लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीच्या रिंगणात इंडिया आघाडी व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघांचे उमेदवार अनंतजी गिते यांच्या प्रचारा करिता रोहा येथे शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे ,शेकाप नेते आमदार जयंत भाई पाटील,माजी आमदार पंडीत शेठ पाटील, राष्ट्रवादी चे नेते आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल तटकरे प्रसंगी प्रचार सभेत उपस्थीत राहुन कार्यकर्ते तसेच मतदार बंधू भगिनी यांना मार्गदर्शन करणार आहेत...
शुक्रवार दिनांक ३ में रोजी सायंकाळी ठीक 0६:00 वाजता राममारुती चौक रोहा येथे सुनील तटकरे यांच्या विरोधात रायगडाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत नेत्या सौ सुषमाताई अंधारे , शेकाप नेते जयंता भाई पाटील काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे...
मोदी सरकारच्या काळात गेली दहा वर्षे जनता महागाईच्या घाईत होरपलते, उच्च शिक्षित तरुण रोजगार नसल्याने बेरोजगार, महाराष्ट्रात कारखाने आलेच नाहीत तर आलेले कारखाने गुजरातकडे पळविले शेतकऱ्यांच्या शेतीमालाला पुरेसा हमीभाव मिळत नाही ,गेली बारा वर्ष मुंबई गोवा महामार्ग रखडले,यावर अंधारे ताई तसेच रायगडची तोफ नेते जयंता भाई पाटील मोदी सरकार आणि गीते यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर काय बोलणार याकडेच सार्वांचे लक्ष लागले आहे...
महायुतीच्या लोक नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीचा नेत्यांवर उलट सुलट ओढलेले ताशेरे याला शिवसेनेच्या नेत्या अंधारे ताई तसेच शेकाप नेते जयंता भाई काय उत्तर देतात याकडे रोहेकरांसह संपुर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.देशाची लोकशाही वाचविण्यासाठी ती बळकट करण्यासाठी शेतकरी कष्टकरी यांच्या न्यायी हक्कासाठी तसेच बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न संसदेत आपल्या हक्काच्या लढ्यासाठी जन सामान्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एक दिलाने अनंत गीते यांचे प्रचार गावागावात घरोघरी मतदारांच्या गाठी भेटी घेत करत असून आज शुक्रवारी गिते यांच्या जाहीर प्रचार्थ सभेसाठी जय्यत तयारी माहाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत...
