पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर)
गुरुवारी १६ में रोजी सायंकाळच्या सुमारास कोलाड परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याने मोठा तडाखा दिल्याने काही ठिकाणी घरांवरील कौले तसेच पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे...
रोहा तालुक्यातील काही भागांमध्ये गुरूवारी दुपारनंतर तुफान वादळ आणि अवकाळी पावसाचे रुद्रावतार पाहवयास मिळाले अचानक सुरू झालेले वादळ बघता बघता तूफान झाले तर कोलाड परीसरात या अवकाळी पावसामुळे भात शेती सह फलबगायत तसेच विटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले तर पुगाव येथील काही घरांवरील तर तेथील स्मशान शेडवरचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे...
तसेच अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण ते इंदापूर दरम्यान काही काळ देखील वाहतूक ठप्प झाली होती.मात्र वादळी वाऱ्यामुळे दरम्यानच्या महामार्गावर कोणत्याही प्रकारचा आपघात अथवा झाड कोसळले नसल्याने तद्नंतर लगेचच पुन्हा वाहातून सुरळीत सुरू झाली होती. सोसाट्याच्या वारा आणि पाऊस त्यामुळे अंधार पडला होता भयानक गोंगावणारा वारा त्यामुळे त्यामुळे पुढील अंतर वाहतुकीसाठी काही वाहन चालकांस वाहन चालवणे अवघड देखील होत असल्याकारणाने वाहतूक मंद गतीने व सुरळीत सुरू होती...
तसेच गेली तीन दिवस दुपारनंतर वाऱ्या पावसाचा होत असलेला धुमाकूळ त्यामुळे कोलाड परिसरातील खांब, पुगावं, पुई, गोवे, मुठवली, शिरवली, कोलाड, वरसगाव, चिंचवली, तिसे,सह येथील शेतकऱ्यांची उन्हाळी भात पिक संकटात सापडले असुन कापणीला आलेले पीक अवकाळी पावसाने झोडपले त्यामुळें बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे दिसून येत आहे अनेक दिवस उष्णेतेचा भायानक पारा चढल्याने अंगाची लाही लाही होत होती त्यात लोकसभेची निवडणुक देखील असल्याने भात कापणीला बळीराजाकडून विलंब झाला असावा त्यात मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने त्यात अधिक भर अवकाळी पावसाची त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दिसत आहे...
तर गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वादळवाऱ्यामुळे कोलाड खांब परिसरात मोठा तडाखा दिल्याने काही ठिकाणी घरांवरील कौले पत्रे उडाल्याने घर मालकांचे तसेच भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या संबधीत खात्याकडून त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे...
