पुगाव- रोहा (नंदकुमार कळमकर)
एसटीचा प्रवास महिलेला पडला महागात लाल परीत चोरटे मरतात डल्ला त्यामुळे आता प्रवास करणाऱ्या महिलांच्यात एकच संतापाची लाट उसळली असून चक्क प्रवासात चोरटे मरतात डल्ले त्यामुळे महिलांना प्रवासाची चिंता वाढली असल्याने एसटी प्रवासात चोरट्यांची संख्या वाढल्याने त्यांचा प्रवास धोक्याचा झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे तर सदरची घटना ही माणगाव कोलाड दरम्यानच्या प्रवासात घडली असुन सर्वत्र एकच खळबळ माजली आहे...
सदर या बाबत सविस्तर माहिती अशी की श्रीमती सविता पांडुरंग शेडगे, वय 40, रा. सध्या रा मनिषा नगर कळवा ठाणेठेमुरा मालुस्ते ता. माणगांव, जिल्हा रायगड,या एसटी बस मध्ये माणगाव कोलाड दरम्यानच्या प्रवास करत असताना यांचेकडील दागिने तसेच रोख रक्कम सह पर्स एका आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी १३ मे रोजी सकाळी १०:४५ वाजता घडली असल्याचे समजले त्यामुळे आता एसटी बस मध्ये प्रवास करणे ही बाब महिलांसाठी धोक्याची झाली असल्याचे सर्वत्र बोलले जात असून या बाबत कोलाड पोलिस ठाण्यात चोरीबाबतची तक्रार दाखल काण्यात आली आहे...
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरिक्षक मोहिते यांच्या सह सहकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली तर कोलाड पोलीसांकडून या बाबत मिळालेल्या माहितीनूसार वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील फिर्यादी या त्यांचे राहते घर मालुस्ते ता. माणगांव जि. रायगड येथुन ठाणे येथे जाणेकरीता माणगांव बस स्थानक वरून श्रीवर्धन ते ठाणे या बसमधुन प्रवास करित असताना बस कोलाड बस थांबा येथे आलेवेळी फिर्यादी यांचे ताब्यातील पर्स मधील वर्णनो दागिने व रोख रक्कम बसमधुन कोणातरी अज्ञात इसमाने संमतीशीवाय स्वताचे फायदयाकरीता चोरून नेली..
चोरीस गेलेल्या अंतर्भूत मालमत्तेचा तपशील/मालमत्तेचे एकूण मुल्य
60000 रू कींमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंथन, 20000 रू कींमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याची फुले, 20000 रू किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातली सोन्याची चैन जु वा की सु, 20000 रू किंमतीचे 3 सोन्याचे अंगठया एक 2 ग्रॅम वजनाची व दोन प्रत्येकी दीड ग्रॅम वजनाची जु वा की सु, 20,200 रोख रक्कम त्यात 500 रू दराच्या 36 नोटा व 100 रू दराच्या 8 नोटा 200 रू दराच्या 7 नोटा असे एकुण 1,40,200 रू रक्कमेसहित दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारत माळ लंपास केला आहे...
तर घडलेल्या घटनेचा कोलाड पोस्टे गुरनं 0051/2024 भा.दं.वि.क. 379 प्रमाणे नोंद करण्यात आली असून कोलाड पोलिस निरिक्षक मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई चौधरी हे अधिक तपास करीत आहेत...
