कोलाड (श्याम लोखंडे)
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभाग कोलाड कुणबी समाजाचे अध्यक्ष संदेश लोखंडे आंबेवाडी यांचा पुत्र सिद्धांत लोखंडे वय वर्ष (२३) याचे शनिवारी १३ एप्रिल रोजी आकस्मित निधन झाल्याने लोखंडे परिवारावर दुःखाचे डोंगर तर परीसरात शोककळा पसरली आहे...
लहान थोरांसह साऱ्यांचा लाडका भाई सिद्धांत लोखंडे हा अतिशय प्रेमळ आणि मन मिलाऊ स्वभावाचा इयात्ता दहावी नंतर त्यांनी उच्च शिक्षण म्हणून बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग कोर्स पूर्ण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज लोणेरे रायगड या विद्यापीठात शिक्षण घेत मागील वर्षी डिग्री प्राप्त केली असा गुणवत्तेत हुशार असा गोंडस सिध्दांत याचे मोठ्या दुर्दैवाने अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाल्याने लोखंडे कुटुंबात मोठा शोक अनावर होत आहे...
मुलाला चांगले शिक्षण देवूनही आई वडीलांच्या पदरी निराशा. तर सिद्धांत याच्या अचानक जाण्याने त्याच्या मित्र परिवारात तसेच समाजात आंबेवाडी कोलाड सह परीसरात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या निधनाची वार्ता समजताच लोखंडे यांचे नातलग तसेच समाज बांधव सामजिक शैक्षणीक,राजकीय, तसेच विविध क्षेत्रातील असंखे दुःखी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते तसेच सिध्दांत याला विविध स्तरांतून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली...
सिद्धांत यांच्या पश्चात आई वडील,आणि भाऊ असा लोखंडे परिवार असून त्याचे पुढील कार्य विधी सोमवारी,२२ एप्रिल रोजी दशक्रिया विधी ही श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर पाली येथे संपन्न होणार आहेत तर उत्तर कार्य तेरावे गुरूवारी २५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे आंबेवाडी येथे संपन्न होणार आहेत..
