महाराष्ट्र वेदभुमी

जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मलाट, अंगाची लाही लाही, पारा ४४ अंशाहून अधीक



कोलाड (श्याम लोखंडे) 

नागरीक कमालीचे हैराण ..

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली असून, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान ४१ अंशांवर अधिकगेले आहे. रायगड जिल्ह्यात देखील कमालीचे तापमान ४४ अंशहून अधिक सेल्सिअसवर गेल्याने ते सर्वाधिक उष्णता वाढले महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने स्पेशल अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह रायगड,कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत 'हिट वेव्ह' कायम असेल.

सतत मागील ३ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यत तसेच रायगड जिल्ह्यात तापमानात वाढ आहे. दरम्यानच्या काळात काही भागांत ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो, असेदेखील हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता हा अंदाज काही भागात खरे ठरले असून मागील दोन दिवस त्या स्वरूपाचे वारे वाहत आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी तसेच बुधवार दि. 17 व गुरूवारी 18 एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्मालाट उद्भवले आहे . अशी शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार व्यक्त करण्यात आलेली होती. या  सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.यादृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांनी काय करावे व काय करू नये या अनुषंगाने माहिती दिली आहे.

उष्णतेत काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे...

तसेच भरमसाठ वाढलेल्या उष्णतेत काळजी कशी घ्यावी पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.  दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.  हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.  प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.  शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.  अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. 

         

तसेच पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.  सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.  पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी असे आवाहन रायगड जिल्हा अधिकार यांनी केले आहे .


त्याच बरोबर उन्हात अती कष्टाची कामे करू नका.  दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे असे आवाहन करत तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत असे सांगितले आहे .

सकाळी सात वाजताच सुमरास रोहा तालुक्यात उष्णतेचा पारा ३० अंशाहून अधिक त्यात दुपारी अधिक वाढ होत असल्याने माणसांच्या शरीराची लाही लाही होत आहे तसेच पशू प्राणी यांचे देखिल जीवन या उष्म्यामुले संकटात सापडत असल्याचे दिसून येत आहे तर दुपारच्या सुमारास बाजार पेठेत देखील शुक शुकाट पहावयास मिळते तसेच अधिक हवामान विभागाने २० एप्रिल पर्यंत ठाणे आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे असल्याने अधिक पुढील तीन दिवस या उष्णतेच्या लाटा उसळत राहणार त्यामुळे अधिक उष्णतेचा पारा आणि उस्म्याची लाट सहन करावी लागणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post