वार्ताहर : नंदेश गायकर
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही बुधवार दिनांक १७/४/२०२४ रोजी रोहा तालुक्यातील भागिरथीखार येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली... गावात अत्यंत भक्तिमय आनंदाचे वातावरण होते...
उत्सव साजरा करण्यात महिला मंडळ तसेच ग्रामस्थ भागिरथीखार यांनी अथक परिश्रम घेतले... सकाळी श्रींचा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...तसेच संध्याकाळी हरिपाठ आणि गावातील लहान मुलांच्या नृत्यांचे सादरीकरण कार्यक्रम ठेवण्यात आले होते...
''राम आयेंगे तो अंगणा सजाऊंगी,राम आयेंगे तो दिपक जलाऊंगी..,इतका उत्साह आया बहिणींच्या माता माऊलीच्या मनात संचारला होता...प्रत्येकानी श्री राम नवमीचा आनंद भक्तिच्या सागरात न्हावून घेतला..
