उरण सुनील ठाकूर
संतप्त शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांचा सवाल
हे तर ओसाड गावाचे पाटील व कोतवाल स्वतःच्या सोबत स्वतःचा सख्खा भाऊ नाही, गावात अजून पर्यंत शिवसेनेची शाखा नाही, उरण मतदार संघात कुठल्या बुथवर बूथप्रमुखाचा पत्ता नाही.. अशांच्या हातामध्ये उरणची सूत्रे शिवसेना शिंदे गटांनी दिल्यामुळे शिवसेनेत मोठा गोंधळ उडालेला आहे.. अशांच्या हातात या निवडणुकीत निवडणुकीची सूत्रे दिली तर मोठा अनर्थ घडेल व शिवसेना ही बदनाम होईल... अशी खंत वजा तक्रार शिवसेना शाखाप्रमुख, विभाग प्रमुख व संपर्कप्रमुख यांनी केले आहे.. चिरनेर विभाग प्रमुख विजय पाटील, जासई विभाग प्रमुख वैभव पाटील, गव्हाण विभाग प्रमुख प्रभाकर पाटील, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे ,आतिश ठाकुर ,शाखाप्रमुख अनंत गडकरी, धनंजय कोळी, ज्ञानेश्वर पाटील, संतोष मोकळ, खारकोपरचे शाखाप्रमुख सचिन देशमुख आदी मान्यवरांनी प्रसार माध्यमाला सांगितले आहे...
वरिष्ठ आमच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे नाईलाजाने प्रसार माध्यमाकडे आम्ही तक्रार केली आहे... असे त्यांनी म्हटले आहे .. उरण विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख म्हणजे ओसाड गावचे पाटील असून त्यांच्यासोबत काम करणारे संघटक हे त्यांचे "कोतवाल" आहेत... घरत/पाटील हे नेमकं काय गौडबंगाल आहे याबाबत उलट सुलट चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहेत.. मात्र पक्षाला बदनाम करणाऱ्या अनेक घटना या ठिकाणी ते करत आहेत , याकामी उपजिल्हाप्रमुख हे माननीय खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या कार्यालयात काम करीत असल्याचा गैरफायदा त्यांनी अनेक ठिकाणी केला आहे..
याबाबत सविस्तर वृत्त आम्ही प्रसार माध्यमाद्वारे आखो देखा हाल म्हणून जनतेसमोर आणणार आहोत.. तसेच उपजिल्हाप्रमुख व संघटन यांनी आपल्या स्वतःच्या गावात शिवसेनेची शाखा दाखवा व स्वतःचे सख्खे भाऊ तुमच्या सोबत दाखवा व आमच्याकडून दोन हजार रुपये २०००/- मिळवा असे आवाहन केले आहे...स्वतःच्या गावात शाखाप्रमुख ज्या दिवशी हे दोघेजण बैठक घेतील त्यावेळी त्यांना पत्रकारांच्या साक्षीने दोन हजार रुपये रोख २०००/- दिले जातील असेही वरील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे....
