महाराष्ट्र वेदभुमी

रोह्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांना टोला



माणगाव प्रतिनिधी:सिकंदर आंबोणकर 

तटकरेंचा सातबारा उतारा रोहा तालुक्या पुरताच मर्यादित आहे,ते स्वतःला मोठे सम्राट समजतात,माझ्या सारखा मोठा कोणी राजकारणी नाही;या लोकसभेला तटकरेंचा सातबारा कोरा केल्याशिवाय अनंत गीते राहणार नाही असा टोला गोरेगाव येथील इंडिया आघाडीच्या सभेमध्ये लगावला.

दि.०२/०४/२०२४ रोजी रुक्मिणीबेन मंगल कार्यालय गोरेगाव -माणगाव येथे इंडिया आघाडीचा जनसंवाद दौरा पार पडला त्या सभेत ते बोलत होते.ह्या सभेसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे द.रायगड संपर्क प्रमुख संजय कदम,द.रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,महाड विधानसभेचे नेते हनुमंत जगताप,महाडच्या मा.नगराध्यक्ष स्नेहल जगताप,शे.का.प. माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे,रा.कॉ.(शरद पवार गट) जिल्हा अध्यक्ष येलवे, शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक बळीराम घाग,माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी,माणगाव ता.संघटक सिताराम मेस्त्री,द.रायगड युवासेना अधिकारी चेतन (बंटी) पोठफोडे,अल्पसंख्याक माणगाव तालुका प्रमुख वलीद हुर्जुक,गोरेगाव शहर प्रमुख मंगेश बामणोलकर,विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, शिवाजी गावडे,विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर,चंद्रकांत यादव,राजा बिरवाडकर,रोहीत रातवडकर,अक्षय कदम,तसेच इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सर्व महीला आघाडी प्रमुख, युवासैनिक,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post