अलिबाग : अब्दुल सोगावकर
सोगाव : दी लाईफ फाऊंडेशन तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मेघा चित्रमंदिर, अलिबाग येथे शनिवार दि. ३० मार्च २०२४ रोजी साजरा करण्यात आला...
दी लाईफ फाऊंडेशनच्या सह-संस्थापक पूनम लालवानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कूचिक, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी विजय मयेकर, शिक्षणतज्ज्ञ रेखा सहानी, सत्य साई मिशन सामाजिक कार्यकर्ती शालिनी मखीजा, विनोद लाला, अजित लालवानी, महेश माखीजा, आयसिडीएस पर्यवेक्षिका उल्का कुलकर्णी, विनोदिनी मोकल, भाग्यश्री पाटील, सामिया पेरेकर, दीप्ती मोकल, कल्पिता साळावकर, दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, कार्यक्रम प्रमुख पल्लवी राणे, सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ, राखी राणे, प्रियांका शिंदे, तसेच मुस्कान शेख, योजना शितोळे, प्रदीप दबळे, स्वप्नाली, प्रदीप पाटील, विद्या इ. दी लाईफ फाऊंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे ढोल ताशे यांच्या गजरात स्वागत करण्यात आले, तर अंगणवाडी सेविकांनी मान्यवरांचे औक्षण करून झाल्यानंतर लेझीम पथक यांनी आदरपूर्वक सांस्कृतिक परंपरा जपत लेझिम खेळत मान्यवरांना सभागृहात आणले. मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे दी लाईफ फाऊंडेशनच्या वतीने भेटवस्तू व वृक्षरोप देऊन यथोचितपणे स्वागत करण्यात आले. यावेळी तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा जीविता पाटील यांनी अंगणवाडी सेविकांसाठी चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल अध्यक्षा पुनम लालवानी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच आयसिडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी देखील आयसिडीएस विभागातर्फे अध्यक्षा पुनम लालवानी तसेच सिईओ सत्यजित बडे, डीवायसिईओ निर्मला कुचिक यांचे विशेष आभार मानले. दी लाईफ फाऊंडेशनचे रायगड जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात दी लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांसाठी सामाजिक हिताची जाणीव ठेवून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली व या आयोजित कार्यक्रमाचा हेतू हा अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून मदत करणे हा असल्याचे सांगितले...
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी अंगणवाडी ताई या खऱ्या अर्थाने समाजात अगदी तळागाळात लहान बालकांपासून ते किशोरवयीन मुले, मुली, गरोदर, स्तनदा मातांपर्यंत पोहोचणाऱ्या व त्यांना सेवा सुविधा पोहोचविणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, असे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले, तसेच नेहमीच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत व्यक्त केले. दी लाईफ फाऊंडेशनच सारखी सामाजिक संस्था त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी इतका मोठा व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याने अध्यक्षा पुनम लालवानी व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले..
यावेळी अंगणवाडी सेविकांनी १९६० पासून ते आत्तापर्यंतच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वेशभूषेतील चित्रकारेतुन अतिशय सुंदर पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते प्रणय ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलीवूड रेट्रो थीम वर आधारित 'फॅशन शो' सारखा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. यामध्ये सहभाग घेतलेल्या २० अंगणवाडी सेविकांना पारितोषिक देण्यात आले. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते अलिबाग तालुक्यातील उत्कृष्ट अंगणवाडी स्पर्धेत निवड झालेल्या पंधरा अंगणवाडी सेविकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेल्या रेवदंडा बिटातील थेरोंडे अंगणवाडी सेविका कामिनी धीरज हले यांना १५,०००/- रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक पोयनाड बिटातील सुकटने अंगणवाडी सेविका सुनिता सत्यवान म्हात्रे यांना १०,०००/- रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देण्यात आले, तसेच पोयनाड बिटातील बांधण अंगणवाडी सेविका श्वेता सिकंदर केळकर यांना ५,०००/- रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या शुभहस्ते देवून गौरविण्यात आले. यावेळी खास महिलांचे आकर्षण असणारा होम मिनिस्टर खेळ ठेवण्यात आला होता ज्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ता, अभिनेता प्रतिम सुतार व हास्य कलाकार तसेच मोठ्या पडद्यावर झळकणारा अलिबागचा कलाकार 'दगडी चाळ २' फेम योगेश पवार यांनी सांभाळली. यामध्ये होम मिनिस्टर खेळात प्रथम क्रमांक विजेता बिडवागळे अंगणवाडी मदतनीस सिद्धी अक्षय म्हात्रे, द्वितीय क्रमांक गाण तर्फे श्रीगाण आदिवासीवाडी मदतनीस वनिता भालचंद्र नाईक, तृतीय क्रमांक पोयनाड ब मदतनिस संघमित्रा रुपेश जाधव, चतुर्थ क्रमांक तीनविरा अंगणवाडी सेविका दिपाली केतन पाटील तर पाचवा क्रमांक झिराड आदिवासीवाडी अंगणवाडी सेविका पूजा राजेश पार्टे यांनी प्राप्त केला, या विजयी ठरलेल्या पाच जणींना आकर्षक भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले...
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दि लाईफ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात : दी लाईफ फाऊंडेशन तर्फे उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पूनम लालवानी, अजित लालवानी व इतर मान्यवर,
दुसऱ्या चित्रात : दी लाईफ फाऊंडेशन तर्फे उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांक अंगणवाडी सेविका कामिनी धीरज हले यांना पुरस्कार देताना फाऊंडेशनच्या संस्थापक पूनम लालवानी व इतर मान्यवर,
तिसऱ्या चित्रात : दी लाईफ फाऊंडेशन तर्फे उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त सेविका, मदतनीस व उपस्थित मान्यवर,
