मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पाटील कुटुंबियांचे
सांत्वन
अलिबाग (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अलिबागच्या पेझारी इथे पाटील कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांनी मीनाक्षी पाटील यांचे बंधू आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते...
मीनाक्षी पाटील यांच्या जाण्याने घरातील कुणीतरी गेल्याची भावना आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या मीनाक्षी पाटील यांनी माणसे जोडली. भूमिपुत्र आणि मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला. एखादी गोष्ट करायची ठरवली, की त्या त्याचा पाठपुरावा करीत. मतदारसंघातील नागरिकांसाठी त्यांनी केलेले काम प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
