महाराष्ट्र वेदभुमी

शरद पवारांनी तटकरेंना केले मोठे.. त्यांच्याच पाठीत खंजीर



श्याम लोखंडे रोहा रायगड

रायगड लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार


अनंत गीते यांचा रोह्यात कार्यकर्ता मेळावा, गीतेनी तटकरेंचा घेतला खरपूस समाचार, शरद पवार साहेबांनी तटकरेंना मोठे केले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला...

"इंडिया आघाडी" मध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी तसेच इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे अधिकृत निष्कलंक उमेदवार माजी.केंद्रीय मंत्री,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते  यांच्या प्रचारार्थ  धाटाव विभाग जिल्हापरिषद मतदार संघाची जाहीर सभा आर.आय.ए. हॉल धाटाव येथे गुरुवारी  ०४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली..

यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते शेकाप नेत शंकरराव म्हसकर,शिवसेना नेते अनिल नवगणे, सर्वहरा जनआंदोलनाच्या नेत्या उल्काताई महाजन रोहा तालुका शिवसेना प्रमुख समीर शेडगे, रोहा शहर प्रमूख दीपक तेंडुलकर, धाटाव विभाग प्रमुख नितीन वरांगे , शिवराम महाबले सह आदी इंडिया आघाडीचे तसेच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते...

यावेळी रायगड लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार गिते यांनी खरपूस समाचार घेत तटकरे कुटूंबाला  एवढं  उंचावर नेवून टेवलं त्या शरत पवाराच्या पाठीत खंजिर खुपासला .असे म्हणत भ्रष्ट कारभाराचे आरोप केलेले तटकरे यांचावर तरी भाजपने सोबत घेतले .तसेच २०१९ मध्येच तटकरेंचा पराभव होता मात्र शेकाप नेत आ. जयंता भाई पाटील यांच्या पाठिंब्यामुले तो पराभव वाचला मात्र समोरील निवडणुक त्यांचे पराभव निश्चित असल्याचे म्हणाले...

Post a Comment

Previous Post Next Post