महाराष्ट्र वेदभुमी

कवयित्री शरयु पाम्पट्टीवार यांची सावली प्रकाशन समूहाच्या समूहप्रशासिका पदी नियुक्ती


अलिबाग (विशेष प्रतिनिधी)

साहित्य क्षेत्रात चार वर्षांपासून वाटचाल करणाऱ्या सावली प्रकाशन समूहाच्या समूहप्रशासिका पदी दिग्रस, यवतमाळ येथील कवयित्री शरयु पाम्पट्टीवार यांची समूहाच्या वतिने नियुक्ती करण्यात आली आहे.कवयित्री शरयु पाम्पट्टीवार या सहाय्यक शिक्षीका असून साहित्य क्षेत्रातील विविध साहित्य प्रकारांवर मार्गदर्शन करून साहित्यातील विद्यार्थी घडवत आहेत त्यांचे लिखान अनेक दिवाळी अंकात दरवर्षी प्रसिद्ध होत असते. त्यांचे संस्कृत सुभाषिते अर्थासह ,चित्रावर आधारित प्रभात विचार, चारोळ्या विविध आँनलाईन समूहात लेखन करत असतात सध्या त्या सावली प्रकाशन समूहात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असून विविध समूहात स्पर्धांचे परीक्षण करत आहेत. साहित्य क्षेत्रात सर्वांना सुपरिचित असलेल्या कवयित्री शरयु पाम्पट्टीवार यांची सावली प्रकाशन समूहाच्या समूहप्रशासिका पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सावली प्रकाशन समूहाचे प्रशासक सचिन पाटील, समूह संयोजक कवयित्री अंजली गुंजोटे याच्यासह समस्त सावली परिवारा,इतर  सर्व साहित्यिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कवयित्री शरयु पाम्पट्टीवार यांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा..

Post a Comment

Previous Post Next Post