महाराष्ट्र वेदभुमी

कार्यकर्ता म्हणजे कोणत्याही नेत्याचा दारात बांधलेला कुत्रा नव्हे असे गोरक्षा प्रमुख आदित्य गोरेगांवकरांचे विधान

माणगाव प्रतिनिधी : सिकंदर आंबोणकर 

नव्हे असे गोरक्षा प्रमुख आदित्य गोरेगांवकरांचे विधानसुनिल तटकरेंच्या विरोधात काम करणार रायगडची जनता

दि. ०६ एप्रिल २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेचे नाराजीनाट्य चर्चेचा विषय ठरत आहे.कारण सतत सुनिल तटकरेंच्या विरोधात काम करित असलेल्या जनतेवर आज त्यांचे प्रचार करण्याची परिस्थिती वरीष्ठ नेत्यांमुळे निर्माण झाली आहे. परंतू, तटकरेंचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा रायगड लोकसभा मतदार संघातील जनतेने दिला आहे...

निवडून आल्यानंतर सुनील तटकरे सहकारी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देतात. मित्रपक्षांना संपविण्यासाठी राजकीय कारनामे करतात”, असा आरोप जनतेकडून व मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे व त्यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील सुरु आहे. मात्र, त्यांचे प्रचार करायला रायगड मधील जनतेचा विरोध होतांना पाहायला मिळत आहे. सतत हिंदुत्ववादी संघटनांना विरोध करणारे, हिंदुत्ववादी विचारांना विरोध करणारे तटकरेंना निवडून देण्यापेक्षा अनंत गीते केव्हाही बरे,अशी भावना जनतेच्या मनात असल्याचे कळून येत आहे...

मुलगा आमदार,मुलगी मंत्री,पुतण्या माजी आमदार,स्वतः खासदार, "मग आता याला घराणेशाही नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?" हा जनतेचा विकास आहे कि स्वतः चा? शिवसेनेचे ३ आमदार जे वर्षानुवर्ष रायगड विधानसभा मतदारसंघातून कायम निवडून येतात,असे प्रतिनिधी बाजूला सारून स्वतः च्या मुलीला जी प्रथमताच,आमदार झाली, तिला मंत्रिपद मिळवून देणे, "हा स्वार्थी विचार नाही का?" नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील हे विधी लिखितच आहे, मग त्यात भाजपाचा एखादा खासदार पडला तर काय फरक पडतो? ७० हजार कोटींचे सिंचन घोटाळ्याचे आरोप असतानाही भाजपाने सुनिल तटकरेंना उमेदवारी दिल्याने रायगड मधील जनतेने संताप व्यक्त केले आहे...

सुनिल तटकरेंना पुन्हा निवडून देणे म्हणजे हिंदुत्वाचा गळा घोटण्याप्रमाणे आहे. निवडून येताच ते हिंदुत्ववादी संघटनांवरती राजकीय ताकद वापरून दबाव बनवतील व त्या संघटना संपविण्याचा प्रयत्न करतील.सुनिल तटकरे हे शांतता प्रिय समाज प्रेमी आहेत व त्या समाजातील कार्यकर्ते त्यांना "आपले बाप" म्हणुन संबोधतात. त्यामुळे हिंदूचे तुष्टीकरण कसेही होणारच! सुनिल तटकरे निवडून येणे म्हणजे मित्र पक्षांना धोकाच! आपले सहकारी मित्र पक्षांना संपविण्याचा पुरे-पूर प्रयत्न करणारे तटकरे, जसे मागील टर्म मध्ये केले होते. तेव्हा रायगड मधील जनतेने विचार करून मतदान करावे असे आवाहन गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकरांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post